India 24Hours news

India News: Get latest news & live updates from India, live India news headlines, breaking news India. Read all latest India news & top news on India Today.

Breaking

Post Top Ad

Friday, May 22, 2020

डॉ. हर्षवर्धन यांनी WHO च्या कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला



केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज (शुक्रवार, २२ मे) जागतिक आग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारला. हा पदभार स्वीकारताना नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. हर्षवर्धन यांनी जगभरात कोविड-१९ने मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांबाबत दु:ख व्यक्त केले.

नवी दिल्ली: भारतातील करोनाच्या लढाईतील एक अग्रगण्य योद्धा, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज (शुक्रवार, २२ मे) जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारला. डॉ. हर्षवर्धन हे कोविड -१९ विरुद्ध भारतातील युद्धाच्या अग्रगण्य लोकांपैकी एक आहेत. डॉ. हर्षवर्धन यांची नियुक्ती जपानचे डॉ. हिरोकी नाकातानी यांच्या जागी झाली आहे. नाकातानी हे डब्ल्यूएचओच्या ३४ सदस्यीय मंडळाचे अध्यक्ष होते.



हा पदभार स्वीकारताना नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. हर्षवर्धन यांनी जगभरात कोविड-१९ने मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांबाबत दु:ख व्यक्त केले. कोविड-१९ सारख्या जागतिक संकटांशी लढत असताना जागतिक भागादारी आणि सामायिक प्रतिसादाची आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले.

जागतिक आरोग्य संघटनेच्या बैठकीत भारताच्या वतीने नामांकित करण्यात आलेले डॉ. हर्षवर्धन यांची नियुक्ती करण्याच्या प्रस्तावावर मंगळवारी १९ मे रोजी १९४ देशांनी सह्या केल्या होत्या. त्यानंतर, डॉ. हर्षवर्धन हे पद ग्रहण करणे ही केवळ औपचारिकता शिल्लक होती. मे पासून सुरू होणार्‍या ३ वर्षाच्या कार्यकाळात भारत कार्यकारी मंडळावर राहील, असेही यावेळी सर्वानुमते ठरविण्यात आले आहे.

२२ मे रोजी कार्यकारी मंडळाच्या बैठकीत डॉ. हर्षवर्धन यांची निवड केली जाईल असे जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते. प्रादेशिक गटांमधील अध्यक्ष पद एक वर्षासाठी रोटेशन तत्त्वावर दिले जाते. दरम्यान, आज, शुक्रवारी (२२ मे) संघटनेचे पहिले वर्ष सुरू झाले.यासाठी भारताचे उमेदवार कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष असतील असा निर्णय गेल्या वर्षीच घेण्यात आला होता.

डॉ. हर्षवर्धन यांना देण्यात येत असलेली ही पूर्णवेळ जबाबदारी नाही आणि आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांना फक्त कार्यकारी मंडळाच्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवावे लागणार आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. या कार्यकारी मंडळाचे ३४ सदस्य असतील. ते सर्व तांत्रिकदृष्ट्या आरोग्य क्षेत्रातील असतील. या मंडळाच्या वर्षातून कमीतकमी दोनदा बैठका होतात. तर, मुख्य बैठक जानेवारी महिन्यात घेण्यात येते.

No comments:

Post a Comment

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Post Top Ad

Your Ad Spot

Pages