India 24Hours news

India News: Get latest news & live updates from India, live India news headlines, breaking news India. Read all latest India news & top news on India Today.

Breaking

Post Top Ad

Friday, May 22, 2020

कपडे, रंग, घोषणा... सगळं कसं नाटकाच्या स्क्रिप्टप्रमाणे वाटलं: रोहित पवार

कपडे, रंग, घोषणा... सगळं कसं नाटकाच्या स्क्रिप्टप्रमाणे वाटलं: रोहित पवार

कपडे, रंग, घोषणा... सगळं कसं नाटकाच्या स्क्रिप्टप्रमाणे वाटलं: रोहित पवार
महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र भाजपनं पुकारलेल्या आंदोलनाची राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांनी खिल्ली उडवली आहे.
अहमदनगर: भाजपच्या महाराष्ट्र बचाव आंदोलनाची कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी जोरदार खिल्ली उडवली आहे. 'मास्क वापरण्याचा व अंतराचा नियम वगळता हे सगळं आंदोलन नाटकाच्या स्क्रिप्टप्रमाणे वाटलं,' असा बोचरा टोला रोहित यांनी भाजपला हाणला आहे.
रोहित यांनी या संदर्भात दोन ट्विट केले आहेत. त्यात त्यांनी भाजपच्या आंदोलनावर टीका केली आहे. 'राजकारण न करण्याचं अनेकदा आवाहन करूनही तुम्ही ते टाळूच शकत नाही का?,' असा प्रश्न रोहित यांनी भाजपच्या नेत्यांना केला आहे. 'लोकांच्या हक्कासाठी आणि कोणत्याही उत्स्फूर्त आंदोलनासाठी अशा लिखित मार्गदर्शनाची गरज नसते. पण भाजपनं एखाद्या दिग्दर्शकाप्रमाणे कपडे, रंग, मीडिया, घोषणा, अंतर असं सगळं लिहून दिलं,' असं त्यांनी म्हटलं आहे.
आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये ते म्हणतात, 'मास्क वापरण्याचा व अंतर ठेवण्याचा नियम वगळता भाजपचं सगळं आंदोलन एखाद्या नाटकाच्या स्क्रिप्टप्रमाणेच वाटलं. आज राज्याला अशा नाटकाची नाही तर सहकार्याची गरज आहे. त्यामुळं राज्यातील लोकांचा आणि कोरोना वॉरियर्सचा अपमान करू नका,' अशी कळकळीची विनंतीही त्यांनी भाजपला केली आहे.
दरम्यान, सत्ताधाऱ्यांकडून खिल्ली उडवली जात असतानाही भाजपनं आज ठरल्याप्रमाणं आंदोलन केलं. भाजपचे राज्यातील सर्व प्रमुख नेते आंदोलनात सहभागी झाले होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील पक्ष कार्यालयाबाहेर निषेधाचे फलक झळकावले तर, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात येथील आपल्या घराच्या अंगणात सहकुटुंब आंदोलन केलं. विशेष म्हणजे, भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे हेही या निषेध आंदोलनात उतरले होते.







No comments:

Post a Comment

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Post Top Ad

Your Ad Spot

Pages