India 24Hours news

India News: Get latest news & live updates from India, live India news headlines, breaking news India. Read all latest India news & top news on India Today.

Breaking

Post Top Ad

Saturday, May 23, 2020

...म्हणून कपिल शर्माने ट्विटरवर मागितली माफी | Kapil Sharma

...म्हणून कपिल शर्माने ट्विटरवर मागितली माफी | Kapil Sharma
...म्हणून कपिल शर्माने ट्विटरवर मागितली माफी | Kapil Sharma

सतत होत असलेल्या विरोधानंतर कपिल शर्माने पुढे येऊन माफी मागण्याचा निर्णय घेतला. कपिलला यागोष्टीची पूर्ण जाणिव आहे की, ज्या उंचीवर तो आहे तो साऱ्यांनाच नाही मिळत. जुन्या चुकांमधून शिकत त्याने लगेच माफी मागितली.

मुंबई- विनोदवीर कपिल शर्माने 'द कपिल शर्मा शो' मधील एका एपिसोडमध्ये देव चित्रगुप्तवर एक टिपणी केली होती. त्याची ही टिपणी कायस्थ समाजाला पटली नाही. अखेर कपिलने ट्विटरवरून यासंबंधी क्षमा मागितली.

कपिलने ट्वीट करत म्हटलं की, 'प्रिय कायस्थ समात २८ मार्च २०२० रोजी प्रक्षेपित झालेल्या 'द
कपिल शर्मा शो' मधील भागात श्री चित्रगुप्त यांच्या उल्लेखावरून जर तुमच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी आणि माझ्या टीमच्या वतीने तुमची क्षमा मागतो.' कपिलने पुढे लिहिले की, 'आमचा हेतू कोणाच्याही भावना दुखावण्याचा नव्हता. देवाकडे हीच प्रार्थना करेन की तुम्ही सर्व आनंदी रहा, सुरक्षित रहा आणि हसत रहा. नमस्कार.'
या ट्वीटमध्ये कपिलने कायस्थ सभा आणि माजी केंद्रीय मंत्री सुबोधकात सहाय यांना टॅग केलं. दरम्यान काही दिवसांपूर्वी कपिल शर्मा आणि चंदन प्रभाकर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अर्चना पूरण सिंगने सोशल मीडियावर शेअर केला होता. यात कपिल आणि चंदन दोघं बेभान होऊन नाचताना दिसत आहेत.

No comments:

Post a Comment

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Post Top Ad

Your Ad Spot

Pages