थुंकल्यास किंवा धुम्रपान केल्यास 'ही' शिक्षा होणार!
थुंकल्यास किंवा धुम्रपान केल्यास 'ही' शिक्षा होणार! |
मुंबई: वाढत्या करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यसरकारने आता स्वच्छतेवरही भर देण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्य सरकारने सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, सुपारी, पान, पानमसाला, गुटखा तसेच अन्य तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्यास, थुंकण्यास व धुम्रपानास प्रतिबंध करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला असून सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना दंडासह शिक्षा ठोठावण्यात येईल. तसेच त्यांना एक दिवस सार्वजनिक सेवा करण्याचीही शिक्षा दिली जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्रीराजेश टोपे यांनी आज येथे दिली.
सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या, धुम्रपान करणाऱ्यास पहिल्या गुन्ह्यासाठी एक हजार रुपये दंड व एक दिवस सार्वजनिक सेवा करावी लागेल. त्याच व्यक्तीच्या दुसऱ्या गुन्ह्यासाठी ३ हजार रुपये दंड व तीन दिवस सार्वजनिक सेवा आणि तिसऱ्या व त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी ५ हजार रुपये दंड व ५ दिवस सार्वजनिक सेवा अशा शिक्षेची तरतूद आहे. भारतीय दंड संहितेनुसार विविध कलमांनुसार सहा महिने, २ वर्ष शिक्षा व दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा ठोठावण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये किंवा धुम्रपान करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
No comments:
Post a Comment