India 24Hours news

India News: Get latest news & live updates from India, live India news headlines, breaking news India. Read all latest India news & top news on India Today.

Breaking

Post Top Ad

Saturday, May 30, 2020

चाचण्या यशस्वी झाल्यास सप्टेंबरपर्यंत करोनावर लस |covid 19 news | Pune News

covid 19 news
चाचण्या यशस्वी झाल्यास सप्टेंबरपर्यंत करोनावर                        लस |covid 19news 

करोनाचा संसर्ग वाढत असल्याने लसीबाबत पुण्यासह देशात उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. त्या लसींच्या प्रक्रियेबाबत सीरमचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला यांनी एका आठवड्यापूर्वीच लस येण्यास दीड वर्षांची प्रतीक्षा करावी लागेल असे सांगितले होते


पुणे
'ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने आम्ही करोनाच्या लशीच्या चाचण्यांवर काम करीत आहोत. सुरक्षा आणि त्याची परिणामकारकता यशस्वी झाल्यानंतरच सप्टेंबर - ऑक्टोबरपर्यंत ही लस बाजारात येऊ शकेल, अशी आमची अपेक्षा आहे. क्लिनिकल चाचण्या यशस्वी झाल्यास पुरेसे डोस उपलब्ध करण्यासाठी लशींचे उत्पादन करण्यात येईल,' अशी माहिती सीरम इन्टिट्यूट ऑफ इंडियाचे (एसआयआय) मुख्य कार्यकारी अधिकारी
आदर पूनावाला यांनी दिली. पहिल्या सहा महिन्यांसाठी सुमारे ५० लाख लशींचे उत्पादन घेण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.

करोनाचा संसर्ग वाढत असल्याने लसीबाबत पुण्यासह देशात उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. त्या लसींच्या प्रक्रियेबाबत सीरमचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला यांनी एका आठवड्यापूर्वीच लस येण्यास दीड वर्षांची प्रतीक्षा करावी लागेल असे सांगितले होते. दरम्यान, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी लशीच्या चाचण्यांबाबत अद्ययावत घडामोडींची माहिती दिली. 'लस तयार करणाऱ्या सात जागतिक संस्थांपैकी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीशी लस प्रकल्पात भागीदारी केली आहे. तेथील डॉ. हिल यांच्यासह आमच्या तज्ज्ञांचे पथक काम करत आहे. लसीच्या चाचण्यांमध्ये आवश्यक सुरक्षा आणि परिणामकारकता तपासून सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत बाजारात ही लस येऊ शकते. इंग्लंडमध्ये सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत क्लिनिकल चाचण्या यशस्वी होतील, या अपेक्षेने आम्ही लस तयार करणार आहोत. क्लिनिकल चाचण्या यशस्वी झाल्यास पुरेसे डोस उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीने उत्पादनाचा निर्णय घेतला आहे. पुढच्या दोन आठवड्यांच्या कालावधीत आम्ही या लशीच्या भारतातही चाचण्या सुरू करणार आहोत,' अशी माहिती पूनावाला यांनी दिली.

'लस उत्पादनासाठी आमची पुण्यातील सुविधा सज्ज आहे. लशीसाठी नव्याने सुविधा तयार करण्यास आणखी दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागू शकतो. आमच्या सध्याच्या तयार असलेल्या एका युनिटचे उत्पादन सुमारे तीन आठवड्यात सुरू होईल,' अशी ग्वाही त्यांनी दिली. नियमांचे पालन करूनच चाचण्या करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.

पहिल्या सहा महिन्यांसाठी लशीचे सुमारे ५० लाख डोस तयार करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. त्यानंतर चाचण्यांच्या यशस्वीतेवर आम्ही दरमहा १०० कोटी डोसेसचे उत्पादन करू. हे उत्पादन भारतासह अन्य अधिकाधिक देशांमध्ये उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.

- आदर पूनावाला, मुख्य कार्यकारी अधिकारी, सीरम इन्स्टिट्यूट

थुंकल्यास किंवा धुम्रपान केल्यास 'ही' शिक्षा होणार! |

चाचणीच्या किट्स उत्पादनाचे लक्ष्य

'करोनाच्या चाचणीच्या किट्सचे उत्पादन करण्याचे आमचे उद्दिष्ट असून, त्यासाठी आम्ही नुकतीच 'मायलॅब' या संस्थेशी भागीदारी केली आहे. या किटची आठवड्याच्या उत्पादनाची क्षमता दीड लाख असून, ती क्षमता वीस लाखांपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट आहे. अधिक प्रभावी लस विकसित करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. या आजाराचे तत्काळ निदान होईल, आणि त्यावर तातडीने उपचार सुरू होतील, असे आमचे प्रयत्न आहेत. कच्च्या मालासाठी आम्ही सिंजेन इंटरनॅशनलबरोबर भागीदारी केली आहे. त्यामुळे कच्च्या मालाचा तुटवडा होणार नाही,' असे आदर पूनावाला म्हणाले.

No comments:

Post a Comment

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Post Top Ad

Your Ad Spot

Pages