India 24Hours news

India News: Get latest news & live updates from India, live India news headlines, breaking news India. Read all latest India news & top news on India Today.

Breaking

Post Top Ad

Saturday, May 30, 2020

लॉकडाऊन करोना थांबवण्यासाठी नव्हे, लांबविण्यासाठी होता: विखे-पाटील |Ahmerdnagar News

लॉकडाऊन करोना थांबवण्यासाठी नव्हे, लांबविण्यासाठी होता: विखे-पाटील
लॉकडाऊन करोना थांबवण्यासाठी नव्हे, लांबविण्यासाठी होता: विखे-पाटील

लॉकडाऊन करोना थांबवण्यासाठी नव्हे, लांबविण्यासाठी होता: विखे-पाटील

‘देशातील लॉकडाऊन करोना थांबविण्यासाठी नव्हे तर लांबविण्यासाठी होतं. मधल्या काळात आपली यंत्रणा सज्ज झाल्यानं रुग्णांची वाढती संख्या हातळण्याची क्षमता निर्माण झालीय. त्यामुळं आता लॉकडाउन शिथील करून इतर कामं सुरू करत करोनाला मागं टाकावं लागले,’ असे मत अहमदनगरचे भाजप खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी व्यक्त केलं.

अहमदनगर: ‘देशातील लॉकडाऊन करोना थांबविण्यासाठी नव्हे तर लांबविण्यासाठी होतं. मधल्या काळात आपली यंत्रणा सज्ज झाल्यानं रुग्णांची वाढती संख्या हातळण्याची क्षमता निर्माण झालीय. त्यामुळं आता लॉकडाउन शिथील करून इतर कामं सुरू करत करोनाला मागं टाकावं लागले,’ असे मत अहमदनगरचे भाजप खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी व्यक्त केलं.

'करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी करण्यात आलेलं लॉकडाऊन शिथिल केल्यामुळं आपल्याकडं रुग्ण वाढले आहेत. लॉकडाऊन उठल्यानंतर त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.’ असं मत कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी ट्विटरवर व्यक्त केलं होतं. त्यानुषंगाने पत्रकारांशी बोलताना डॉ. विखे यांनी हे मत मांडलं. ‘डॉक्टर या नात्यानं सांगतो की, आपल्या राज्यात विशेषत: मुंबईत लोकसंख्येची घनता जास्त असल्यानं तेथे जास्त रुग्ण आढळले. मात्र, योग्य नियोजन करून हे टाळता आलं असतं. देशात लागू करण्यात आलेलं लॉकडाउन करोना थांबविण्यासाठी नव्हे तर लांबविण्यासाठी होतं. इतर देशांच्या तुलनेत आपल्याकडं वेगळी परिस्थिती होती. करोनाशी लढण्याची यंत्रणा आणि लोकांचीही तयारी नव्हती. ती तयारी लॉकडाउनच्या काळात झाली. पायाभूत सुविधा उभ्या राहिल्या, लोकांचीही मानसिकता झाली. त्यामुळं आता आपण करोनासह जगण्यासाठी सज्ज झालो आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनसंबंधी वेळोवेळी योग्य निर्णय घेतल्यामुळंच देश वाचला. त्यांचा लॉकडाऊन करण्याचा उद्देश करोना संपविण्याचा नव्हता, तर या काळात सोयीसुविधा उभारण्यास अवधी मिळावा, असा होता. ती तयारी आता झाली आहे. त्यामुळं आता लॉकडाउन शिथील करून अन्य व्यवहार सुरू केले पाहिजेत. लोकांना त्याची सवय झाली आहे. ते दक्षताही घेऊ लागले आहेत. मात्र, आता गरज आहे ती अन्य कामं सुरू करून त्यांच्या डोक्यातून करोनाची भीती काढून टाकण्याची. आता जनजीवन सुरळीत करण्यावर भर द्यावा लागेल,' असं सुजय विखे-पाटील म्हणाले.



आमदार रोहित पवार, निलेश राणे आणि राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या टिट्वरवर झालेल्या शाब्दिक वादासंबंधी भाष्य करण्यास विखे-पाटील यांनी नकार दिला.‘आपण स्वत: सभ्य आहोत, याबाबतीत फक्त स्वत:चीच गॅरंटी घेऊ शकतो. त्यामुळे इतरांबद्दल बोलणार नाही,’ असं म्हणत त्यांनी या वादावर भाष्य करण्यास नकार दिला.

थुंकल्यास किंवा धुम्रपान केल्यास 'ही' शिक्षा होणार!

आता ते लोकप्रतिनिधी कुठे गेले?

करोनाच्या काळात आपण जनतेला मदत करत असल्याचं सांगताना विखे पाटील म्हणाले, ‘निवडणुकीच्या काळात लग्न, अंत्यविधी आणि दहाव्यालाही हजेरी लावणारे लोकप्रतिनिधी आता कुठं गेले? या काळात त्यांची लोकांना खरी गरज आहे. करोनाला घाबरून ते घरात बसले आहेत. मलाही प्रशासनाकडून जास्त न फिरण्याचा सल्ला देण्यात येत आहे, मात्र लोकांच्या मदतीसाठी आपण फिरत राहणार आहोत.’

No comments:

Post a Comment

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Post Top Ad

Your Ad Spot

Pages