India 24Hours news

India News: Get latest news & live updates from India, live India news headlines, breaking news India. Read all latest India news & top news on India Today.

Breaking

Post Top Ad

Sunday, May 31, 2020

करोनाचा बॉलिवूडला धक्का; प्रसिद्ध संगीतकार वाजिद खान यांचे मुंबईत निधन |covid 19 ,corona virus news

करोनाचा बॉलिवूडला धक्का; प्रसिद्ध संगीतकार वाजिद खान यांचे मुंबईत निधन |covid 19 ,corona virus news 

covid 19 ,corona virus news

अभिनेता सलमान खानच्या जवळच्या संगीतकारांपैकी एक असलेल्या साजिद-वाजिद जोडीतील एक तारा निखळला आहे. वाजिद खान यांचे निधन झाले आहे. वाजिद यांना हृदयविकार आणि किडनीचा त्रास होता. त्यात त्यांची करोना चाचणीही पॉझिटिव्ह आली होती.

मुंबई: बॉलिवूडमधील सध्याच्या आघाडीच्या संगीतकार जोड्यांपैकी एक असलेल्या साजिद-वाजिद जोडीतील वाजिद खान यांचे मुंबईतील चेंबूर येथील रुग्णालयात निधन झाले आहे. ते ४२ वर्षांचे होते.

वाजिद खान व्हेंटिलेटरवर होते. रविवारी दुपारी त्यांची प्रकृती अधिकच खालावली आणि त्यातच त्यांचे निधन झाले. वाजिद यांना किडनीचा तसेच हृदयविकाराचा त्रास होता. आठवडाभरापूर्वीच त्यांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या आजारांच्या गुंतागुंतीतून ते बाहेर येऊ शकले नाहीत. वाजिद खान यांच्या निधनाने बॉलिवूड एका उमद्या संगीतकाराला मुकलं आहे. अभिनेता सलमान खानच्या अनेक हिट चित्रपटांना साजिद-वाजिद या जोडगोळीने श्रवणीय संगीतसाज चढवला होता.


https://india24hoursnews1.blogspot.com/

करोनाची लागण झाली असली तरी वाजिद यांचं निधन किडनी निकामी होऊन झाल्याचे सांगण्यात येत आहे. वाजिद यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. प्रियांका चोप्रासोनू निगम, शंकर महादेवन, वरूण धवन, सलीम मर्चंट यांच्यासह बॉलिवूडच्या अनेक कलावंतांनी ट्विटरच्या माध्यमातून वाजिद खान यांना श्रद्धांजली वाहिली आहे. साजिद-वाजिद जोडी आणि सलमान खान यांचं 'हिट कॉम्बिनेशन' होतं. सलमानच्या अनेक चित्रपटांना या जोडीने संगीत दिलं. अलीकडेच सलमानच्या भाई-भाई आणि प्यार करोना या चित्रपटांसाठी या जोडीने संगीत दिलं आहे.

सलमानकडून पोलिसांसाठी १ लाख सॅनिटायझरच्या बॉटल्सची भेट

'दबंग', 'वॉन्टेड', 'वीर', 'नो प्रॉब्लेम', 'गॉड तुस्सी ग्रेट हो', 'पार्टनर' यासह सलमानच्या विविध चित्रपटांची गाणीही वाजिद यांनी गायली होती. साजिद-वाजिद जोडीने 'एक था टायगर', 'दबंग', 'दबंग २', 'दबंग ३', 'पार्टनर', 'सन ऑफ सरदार', 'रावडी राठोड', 'हाउसफुल २' यांसारख्या अनेक हिट चित्रपटांना संगीत दिलं आहे.

साजिद-वाजिद जोडगोळीचा नेहमीच बॉलिवूडमध्ये दबदबा राहिला. टीव्हीवरील प्रसिद्ध 'सारेगमप २०१२', 'सारेगमप सिंगिंग सुपरस्टार' शोसाठी या जोडीने परीक्षक म्हणून काम पाहिले होते. आयपीएल-४ चं थीम सॉंग 'धूम धूम धूम धडाका' याच जोडगोळीने संगीतबद्ध केलं होतं. हे गाणं वाजिद यांनी गायलं होतं. वाजिद यांच्या निधनाने अनेक हिट गाणी देणाऱ्या साजिद-वाजिद या दोन भावांची ताटातूट झाली आहे. प्रसिद्ध तबलावादक उस्ताद शराफत अली खान हे त्यांचे वडील होते.

तापसी पन्नूच्या आजीचं निधन, अंत्यदर्शनालाही मुकली

No comments:

Post a Comment

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Post Top Ad

Your Ad Spot

Pages