India 24Hours news

India News: Get latest news & live updates from India, live India news headlines, breaking news India. Read all latest India news & top news on India Today.

Breaking

Post Top Ad

Sunday, May 31, 2020

नातेवाईकांना क्वारंटाइन न केल्याचा जाब विचारल्याने मारहाण | Ahmednagar News

नातेवाईकांना क्वारंटाइन न केल्याचा जाब विचारल्याने मारहाण
करोनाचा प्रसार वाढत असताना दुसऱ्या राज्यातून येणाऱ्या नागरिकांना १४ दिवसांसाठी क्वारंटाइन करण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्या आहेत. मात्र, अजूनही या नियमांचे पालन होताना दिसत नाहीये. दरम्यान, यामुळं प्रशासनावरील ताण वाढताना दिसत आहे.
quarantine
quarantine

अहमदनगर: 'दिल्लीवरून आलेल्या भावाला क्वारंटाइन का केले नाही,' असे विचारल्याचा राग आल्याने सात जणांनी एकाला लोखंडी रॉड व लाठ्याकाठ्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. पिंपळगाव लांडगा (ता.नगर) येथील जिल्हा परिषद शाळेसमोर २६ मे रोजी ही घडना उघडकीस आलीये. याप्रकरणी शनिवारी नगर तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने जिल्ह्यामध्ये परजिल्ह्यातून, राज्यातून येणाऱ्यांना संस्थात्मक क्वारंटाइन करण्यात येत आहे. त्यातच जिल्ह्यात मुंबई, पुणे, औरंगाबाद अशा रेड झोनमधून येणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे. संस्थात्मक क्वारंटाइन केले जाईल, या भीतीने अनेकजण विनापरवानच जिल्ह्यात प्रवेश करीत आहेत. त्याबाबतची माहिती प्रशासनाला आजूबाजूच्या लोकांकडून देण्याचा प्रयत्न होत असला तरी त्यामधून वाद उद्भवत आहेत. ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारे वाद होण्याचे प्रकार वाढले असून ते पोलिस स्टेशनपर्यंत येऊ लागले आहेत. काल नगर तालुका पोलिस स्टेशनमध्येही अशाच प्रकारचा गुन्हा दाखल झाला आहे.


पिंपळगाव लांडगा (ता.नगर) येथील अस्लम इस्माईल शेख यांनी गावातील धनंजय श्रीधर लांडगे यांना 'तुझा भाऊ दिल्लीवरून आल्याने त्याला क्वारंटाइन का केले नाही,' असा जाब विचारला. त्यामुळे लांडगे यांना राग आल्याने त्यांनी इतर सहा जणांसह शेख यांना जबर मारहाण केली आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलिस स्टेशनला श्रीधर गंगाधर लांडगे, धनंजय श्रीधर लांडगे, विश्वास दिलीप लांडगे, आनंद दिलीप लांडगे, प्रसाद पोपट लांडगे व इतर दोन अशा सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, याप्रकरणी क्रॉस कॅम्पलेंट सुद्धा दाखल झाली असल्याची माहिती तपासीअधिकाऱ्याने दिली आहे.

No comments:

Post a Comment

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Post Top Ad

Your Ad Spot

Pages