India 24Hours news

India News: Get latest news & live updates from India, live India news headlines, breaking news India. Read all latest India news & top news on India Today.

Breaking

Post Top Ad

Sunday, May 31, 2020

रोहित पवारांनी 'कर्जत-जामखेड'साठी आणला ‘स्मार्ट’ प्रकल्प | Jamkhed Latest News

रोहित पवारांनी 'कर्जत-जामखेड'साठी आणला ‘स्मार्ट’ प्रकल्प

कर्जत-जामखेडचे नव्या दमाचे तरुण तडफदार आमदार रोहित पवार यांनी मतदारसंघात कामाचा धडाका सुरू केला असून आपली कल्पकता वापरून ते नव्या योजना मतदारसंघात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

रोहित पवार
रोहित पवार

अहमदनगर :कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी मतदारसंघासाठी स्टेट ऑफ महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस अँड रूरल ट्रान्सफॉर्मेशन प्रोग्राम म्हणजेच ‘स्मार्ट’ या प्रकल्पाची घोषणा केली आहे. यामध्ये शेतकरी आणि बचत गटांच्या कंपन्या उत्पादक कंपन्या स्थापन करून त्यांना सरकार आणि बँकांमार्फत सहकार्य करण्यात येणार आहे.

लहान मुलांकडं दुर्लक्ष करायचं असतं; तनपुरेंचा निलेश राणेंना टोलाया प्रकल्पाची माहिती देण्यासाठी आणि नियोजन करण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी गुरूवारी मतदारसंघातील संबंधितांशी संवाद साधला. या प्रकल्पातून कर्जत-जामखेड मतदारसंघाला विविध उद्योग व्यवसायांना उभारी मिळणार आहेकृषी विभाग, ग्राम विकास, पशु संवर्धन, पणन, सहकार, महिला व बाल कल्याण, नगर विकास या विभागांच्या यंत्रणा या प्रकल्पात समाविष्ट करून घेण्यात येणार आहेत. जूनपासून हा प्रकल्प सुरू होईल.

मतदारसंघातील शेतकरी आणि बचत गटांच्या उत्पादक कंपन्याना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. या भागातील शेतकरी जो माल उत्पादित करतील त्या मालाची प्रक्रिया करून त्या मालाची परदेशात किंवा पुणे - मुंबई सारख्या मोठ्या बाजारपेठेत विक्री करता येणार आहे. संस्थांची निवड किंवा ऑनलाइन प्रक्रियेसाठी निविदा जूनमध्ये निघणार आहे. प्रकल्पाचा अंमलबजावणी कालावधी सात वर्षांचा आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकारच्या मदतीने वर्ल्ड बँकेकडून अर्थसहाय्य होणार आहे. यासाठी लवकरच प्रशिक्षण कार्यक्रम होणार असल्याचे प्रकल्पाचे प्रवर्तक डॉ. संजय पांढरे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Post Top Ad

Your Ad Spot

Pages