India 24Hours news

India News: Get latest news & live updates from India, live India news headlines, breaking news India. Read all latest India news & top news on India Today.

Breaking

Post Top Ad

Monday, June 1, 2020

लहान मुलांकडं दुर्लक्ष करायचं असतं; तनपुरेंचा निलेश राणेंना टोला

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका करणारे माजी खासदार निलेश राणे यांना नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी बोचरा टोला हाणला आहे.

राणे-तनपुरे

राणे-तनपुरे
अहमदनगर: 'अपशब्द वापरले की आपण काहीतरी पराक्रम केला असा काहींचा समज असतो. खासकरून लहान मुलांना तसं वाटत असतं. अशा लहान मुलांकडं कधी-कधी दुर्लक्ष करायचं असतं. माझ्या कार्यकर्त्यांनाही मी तसा सल्ला दिला आहे,' अशी खोचक टीका राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी माजी खासदार निलेश राणे यांच्यावर केली आहे.



एका रुग्णापायी बीड शहरासह १२ गावं राहणार आठ दिवस बंद

नीलेश राणे आणि रोहित पवार यांच्यामध्ये काही दिवसांपूर्वी 'ट्विटर वॉर' रंगले होते. निलेश राणे यांनी रोहित पवारांवर टीका करताना शेलके शब्द वापरले होते. लायकीची भाषाही केली होती. प्राजक्त तनपुरे यांनीही या वादात उडी घेत काही ट्विट केले होते. या संपूर्ण वादाबद्दल आज तनुपरे यांना विचारलं असता हा वाद आता शमल्याचं ते म्हणाले.

'लोकशाहीमध्ये प्रत्येकाची मतं असतात. लोकशाहीच्या दृष्टीनं ते चांगलंच आहे. एकमेकांना उत्तर द्यायलाही काही हकरत नसते. पण त्याची एक पद्धत असते. एक संसदीय भाषा असते. ते कुठं निलेश राणेंच्या उत्तरात दिसलं नाही. त्यामुळं मी त्यांना चांगल्याच भाषेत सल्ला दिला होता. पण त्यांची भाषा अधिकच घसरली,' अशी खंत तनपुरे यांनी व्यक्त केली.

'रोहित पवार हे एक आमदार आहेत. निलेश राणे यांच्याकडं आता कुठलं पद आहे याची मला कल्पना नाही. पण ते माजी खासदार आहेत. त्यांची भाषा चांगली असेल असं मला वाटलं होतं. पण एकूण त्यांचे शब्दप्रयोग बघता लहान मुलांकडं दुर्लक्ष करा, असा सल्ला मी कार्यकर्त्यांना दिल्याचं तनपुरे यांनी सांगितलं.
कसा सुरू झाला होता वाद?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी साखर उद्योगाला मदत देण्याची मागणी काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारकडं केली होती. त्यास निलेश राणे यांनी आक्षेप घेतला होता. साखर उद्योगाला आतापर्यंत दिल्या गेलेल्या मदतीचं ऑडिट करण्याची मागणी केली होती. रोहित पवारांनी ट्विट करून त्यांना काळजी न करण्याचा सल्ला दिला होता. पवार साहेबांनी अभ्यासाअंतीच ही मागणी केली आहे, असं रोहित पवार म्हणाले होते. त्यावर निलेश राणे यांनी रोहित पवारांना टीका केली होती. अरे-तुरेची आणि लायकीची भाषा वापरली होती.

No comments:

Post a Comment

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Post Top Ad

Your Ad Spot

Pages