India 24Hours news

India News: Get latest news & live updates from India, live India news headlines, breaking news India. Read all latest India news & top news on India Today.

Breaking

Post Top Ad

Saturday, June 6, 2020

चीनवरील टीकेचा मजकूर, व्हिडिओला TikTok लावतो सेन्सॉरची कात्री?

चीनवरील टीकेचा मजकूर, व्हिडिओला TikTok लावतो सेन्सॉरची कात्री?

भारत-चीन सीमावादाच्या पार्श्वभूमीवर चीनवर राजकीय टिप्पणी करणारा, किंवा त्या अंगाने विनोद करणारा कंटेन्ट किंवा व्हिडिओ
टिकटॉक या लोकप्रिय चीनी अॅपवरून काढून टाकले जात आहेत. प्रसिद्ध कॉमेडियन नज्मा आपी या नावाने प्रसिद्ध असलेली सलोनी गौड
 हिचा व्हिडिओही टिकटॉकवरून काढून टाकण्यात आला आहे.

                                       चीनवरील टीकेचा मजकूर, व्हिडिओला TikTok लावतो सेन्सॉरची कात्री?

टिकटॉक
चीनवरील टीकेचा मजकूर, व्हिडिओला TikTok लावतो सेन्सॉरची कात्री?

नवी दिल्ली:नज्मा आपी या नावाने प्रसिद्ध असलेली यूट्यूबर सलोनी गौड हिचा चीनवर विनोदी टिप्पणी करणारा व्हिडिओ चीनी अॅप असलेल्या टिकटॉकला बहुतेक आवडलेला दिसत नाही. असे वाटण्याचे कारण म्हणजे सलोनीने हा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तो टिकटॉकवरून काढून टाकण्यात आला. या वरून दोन देशांदरम्यान सीमेवरून तणाव निर्माण झालेला असताना चीनवर थोडी जरी टीका झालेली आता सहन केली जात नसल्याचे स्पष्ट होत आहे. म्हणूनच शुल्लक राजकीय टीकेला देखील सेन्सॉरशीपच्या कात्रीत सापडावे लागत असल्याचे स्पष्ट होत आहे.


                                       चीनवरील टीकेचा मजकूर, व्हिडिओला TikTok लावतो सेन्सॉरची कात्री?

ही माहिती स्वत: गौडने ट्विट करत दिली आहे. गौड आपल्या ट्विटमध्ये लिहिते, ' टिकटॉक इनने मी चीनवर केलेल्या विनोदाचा शेवटी पोस्ट केलेला व्हिडिओ काढून टाकला आहे. जैसा देश, वैसी अॅप. कुछ बोलने की फ्रिडम ही नही हैं.'
सलोनी गौडने चीनवर एक विनोदी व्हिडिओ बनवला होता. या व्हिडिओमध्ये भारत-चीन सीमावादावर विनोदी भाष्य केले होते. या व्हिडिओत तिने करोना विषाणू आणि टिकटॉकवरी विनोद केले होते. या नंतर सलोनी गौडचा हा व्हिडिओ टिकटॉकने काढून टाकला.


'टिकटॉकवर अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट करण्यात येतात. काही महिलांवरील अत्याचाराशी संबंधित, तसेच काही प्राण्यांवरील अत्याचाराशी संबंधित देखील असतात. अशा व्हिडिओंना लोकांचा विरोध झाला की मग ते काढून टाकले जातात. मात्र, माझा व्हिडिओ हा लोकांना फक्त हसवणे या उद्देशाने तयार केलेला व्हिडिओ होता', अशी प्रतिक्रिया सलोनी गौड हिने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना व्यक्त केली आहे.
टिकटॉकने या संपूर्ण गोष्टीचा संबंध बनावट कोविड मेसेजिंगशी लावला आहे. कोविड -१९ च्या संदर्भात सावधगिरी बाळगण्यासाठी आणि नियमांचे संभाव्य उल्लंघन करणारा मजकूर काढण्यासाठी आम्ही अधिक कठोर पुनरावलोकन प्रक्रिया राबविली आहे. मात्र, तपासणी केल्यानंतर व्हिडिओ पुन्हा इन्स्टॉल करण्यात येतात असे टिकटॉकच्या प्रवक्त्याचे म्हणणे आहे.
भारतात टिकटॉक हे अॅप अत्यंत लोकप्रिय आहे. भारतात महिन्याभरात ३६.७ दशलक्ष लोक टिकटॉक अॅप डाउनलोड केले जाते. या अॅपचे महिन्याला १५८.२ दशलक्ष यूजर्स आहेत.


दरम्यान, टिकटॉकच्या असंख्य यूजर्सना या अॅपच्या शॅडो बॅनचा अनुभव आलेला आहे. एखाद्या यूजरने अपलोड केलेल्या व्हिडिओ किंव कंटेन्टवर टिकटॉककडून काहीही मार्किंग केले गेलेले नसते. मात्र असे असतानाही तो व्हिजिओ किंवा कंटेन्ट इतर यूजर्सना दिसत नाही. हा कंटेन्ट शून्य व्ह्यूज दाखवतो.

#boycottchina या हॅशटॅगला १,४५ ५०० व्हयूज आहेत. तर #boycottchinaproduct ला १,२१,५०० व्ह्यूज आहेत. मात्र यांपैकी काही कंटेन्ट आता अॅपवरून गायब झालेले आहेत. तसेच भारत-चीन सीमा या विषयावर अॅपवर शेकडो व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. यांना #ladakhchinaborder, #chinaladakh, #chinainladakh असे हॅशटॅग देण्यात आलेले आहेत. मात्र, त्यांचे व्ह्यूज पाहिले असताना त्यांना एकही व्ह्यू मिळालेला नसल्याचे स्पष्ट झालेले आहे. तसेच त्यांची लिंकही सापडत नाही. अशाच प्रकारे खुंजेरब, चित्कुल, वेश-चमन, सॉस्ट, वाघा, सियालकोट रामगड अशा हॅशटॅगचीही अवस्था पाहायला मिळत आहे.

'चीनविरोधी कंटेटवर आक्षेप नाही'

मात्र, चीनविरोधी कंटेन्ट किंवा व्हिडिओवर आम्ही सेन्सॉरशीपची कात्री चालवत नसल्याचा खुसाला टिकटॉकच्या प्रवक्त्याने दिला आहे. मात्र, असे असले तरी हे 'शॅडो बॅन' सेन्सॉरशीपहून जराही वेगळे नाहीत, असे म्हटले जात आहे.

No comments:

Post a Comment

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Post Top Ad

Your Ad Spot

Pages