संतापजनक! गायीला स्फोटके खायला घातली, जबडा फाटला
हिमाचल प्रदेशातील विलासपुरात एका गायीला स्फोटके खायला घालण्याची अमानुष घटना घडली आहे. केरळच्या हत्तिणीप्रमाणेच, असामाजिक तत्त्वांनी गायीला स्फोटके दिली. हे कृत्य करणाऱ्यांविरूद्ध गुन्हा दाखल करून अटक केली पाहिजे, अशी मागणी गायीचे मालक गुरदयाल यांनी केली आहे.
हिमाचल प्रदेशातील विलासपुरात एका गायीला स्फोटके खायला घालण्याची अमानुष घटना घडली आहे. केरळच्या हत्तिणीप्रमाणेच, असामाजिक तत्त्वांनी गायीला स्फोटके दिली. हे कृत्य करणाऱ्यांविरूद्ध गुन्हा दाखल करून अटक केली पाहिजे, अशी मागणी गायीचे मालक गुरदयाल यांनी केली आहे. संतापजनक! गायीला स्फोटके खायला घातली, जबडा फाटलासंतापजनक! गायीला स्फोटके खायला घातली, जबडा फाटलाविलासपूर: केरळच्या मलप्पुरममध्ये गर्भवती हत्तिणीला स्फोटके खायला दिल्याने तिचा मृत्यू झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता एका गर्भवती गायीसोबत देखील असाच अमानुष प्रकार उघड झाला आहे. हिमाचल प्रदेशच्या विलासपुरात काहींनी गायीला खाण्याच्या वस्तूतून स्फोटके खालया घातली. ही स्फोटके गायीच्या जबड्यात फुटून गंभीर दुखापत झाली. दरम्यान, गायीच्या मालकाने दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
हे अमानुष प्रकरण झंडूता परिसरातील आहे. एका शेतात चरत असताना, गर्भवती गाईच्या तोंडात स्फोट झाला आणि या स्फोटामुळे गायीचा जबडाच तुटला. गायीच्या मालकाने गायीला झालेल्या दुखापतीचा व्हिडीओ बनवून प्रशासनाकडे मदत घेतली आहे. या व्हिडिओमध्ये या स्फोटात गायीचा जबडा फाटलेला दिसत आहे.गायीच्या मालकाची कारवाईची मागणीअसे अमानुष कृत्य करणाऱ्यांविरूद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे, अशी मागणी या गायीचे मालक गुरदयाल यांनी केली आहे. हे कृत्य आपला शेजारी नंदलाल यांनी केल्याचा आरोप गुरदयाल यांनी केला आहे. गायीला स्फोटके देऊन खायला घालून तो पळून गेला, असे त्यांचे म्हणणे आहे.पोलिसांनी गुन्हा केला दाखलही घटना दहा दिवस जुनी असल्याचे स्थानिक पोलिसांचे म्हणणे आहे. गुरदयाल यांच्या तक्रारीच्या आधारे प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस तपास करत आहेत. आरोपी अद्याप फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
हे अमानुष प्रकरण झंडूता परिसरातील आहे. एका शेतात चरत असताना, गर्भवती गाईच्या तोंडात स्फोट झाला आणि या स्फोटामुळे गायीचा जबडाच तुटला. गायीच्या मालकाने गायीला झालेल्या दुखापतीचा व्हिडीओ बनवून प्रशासनाकडे मदत घेतली आहे. या व्हिडिओमध्ये या स्फोटात गायीचा जबडा फाटलेला दिसत आहे.
गायीच्या मालकाची कारवाईची मागणी
असे अमानुष कृत्य करणाऱ्यांविरूद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे, अशी मागणी या गायीचे मालक गुरदयाल यांनी केली आहे. हे कृत्य आपला शेजारी नंदलाल यांनी केल्याचा आरोप गुरदयाल यांनी केला आहे. गायीला स्फोटके देऊन खायला घालून तो पळून गेला, असे त्यांचे म्हणणे आहे.
पोलिसांनी गुन्हा केला दाखल
ही घटना दहा दिवस जुनी असल्याचे स्थानिक पोलिसांचे म्हणणे आहे. गुरदयाल यांच्या तक्रारीच्या आधारे प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस तपास करत आहेत. आरोपी अद्याप फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
No comments:
Post a Comment