India 24Hours news

India News: Get latest news & live updates from India, live India news headlines, breaking news India. Read all latest India news & top news on India Today.

Breaking

Post Top Ad

Monday, June 15, 2020

Prakash Ambedkar slams Thackeray government | ना नेतृत्व, ना दूरदृष्टी, ना निर्णय क्षमता, महाविकास आघाडीकडे काहीच नाही : प्रकाश आंबेडकर | Ambedkar

ना नेतृत्व, ना दूरदृष्टी, ना निर्णय क्षमता, महाविकास आघाडीकडे काहीच नाही : प्रकाश आंबेडकर

"देश पातळीवर राजकीय नेतृत्व नाही, हे कोरोना संकंट काळात दिसून आलं आहे. तीच गत महाराष्ट्राची झाली आहे", अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली (Prakash Ambedkar slams Thackeray government).
ना नेतृत्व, ना दूरदृष्टी, ना निर्णय क्षमता, महाविकास आघाडीकडे काहीच नाही : प्रकाश आंबेडकर "देश पातळीवर राजकीय नेतृत्व नाही, हे कोरोना संकंट काळात दिसून आलं आहे. तीच गत महाराष्ट्राची झाली आहे", अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली (Prakash Ambedkar slams Thackeray government). INDIA 24 HOURS NEWS
Prakash Ambedkar slams Thackeray government
पुणे : “राज्यात शाळा चालू करायच्या की नाही? हा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून अधांतरी होता (Prakash Ambedkar slams Thackeray government). मात्र आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय जिल्हा प्रशासनावर ढकलून दिला. याचाच अर्थ यांच्यात निर्णय घेण्याची क्षमता नाही. राजकीय नेतृत्व नाही, दूरदृष्टी नाही आणि बेभरवशावरती हे राज्य सोडून दिले आहे. हीच अवस्था ‘जाणता राजा’ची पण आहे” अशी खरमरीत टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली (Prakash Ambedkar slams Thackeray government).
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरु करण्यास मान्यता दिली आहे. ऑनलाईन, डिजीटल पद्धतीने प्रायोगिक स्तरावर शाळा सुरु करण्यात येणार आहे. तसंच ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव नाही त्या ठिकाणी पुरेशी काळजी घेऊन प्रत्यक्ष शाळा उघडता येतील, असा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. याच निर्णयावर प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली.
“केंद्रात मोदी नेतृत्व करु शकत नाही ते निर्णय घेऊ शकत नाही, आपले निर्णय राज्यावर सोडून देतात आणि राज्यातले लोक जिल्हा प्रशासनावर निर्णय सोडून देतात. हे आजच्या निर्णयावरुन दिसून आले. अशा निर्णयाचा आम्ही धिक्कार करतो”, असा घणाघात प्रकाश आंबेडकर यांनी केला.
“शासनाला आमची विनंती आहे की, शाळा सुरु करायच्या की नाही हा निर्णय लवकर घ्या. नाही करायच्या असतील तर तसे स्पष्ट सांगा, करायच्या असतील तर केव्हा करणार, याचे वेळापत्रक जाहीर करा, वेळापत्रक जाहीर करताना जर तरची भाषा वापरायची नाही”, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
“देश पातळीवर राजकीय नेतृत्व नाही, हे कोरोना संकंट काळात दिसून आलं आहे. तीच गत महाराष्ट्राची झाली आहे. केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांवर निर्णय ढकलून मोकळे होतात”, अशीदेखील टीका त्यांनी केली.

No comments:

Post a Comment

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Post Top Ad

Your Ad Spot

Pages