मुंबई पालिकेचा प्रताप; करोनामुक्त महिला घराऐवजी रुग्णालयात| mumbai news
खार येथे राहाणाऱ्या अनुसया सावंत (७८) या महिलेला मेंदूचा पक्षाघात झाल्याने तिच्या नातेवाईकांनी तिला उपचारासाठी बोरिवली येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. प्रकृतीत सुधारणा होत असतानाच तिला करोनाची लागण झाल्याची माहिती रुग्णालयाने नातेवाईकांना दिली.
covid19-test
मुंबईकरोना रुग्णांना महापालिकेच्या विविध प्रकारच्या भोंगळ कारभाराचा अनुभव येत असताना आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. खार येथील एका करोना बाधित महिला रुग्णाला बरे झाल्यानंतर घरी नेऊन सोडण्याऐवजी या महिलेला आधी उपचार घेत असलेल्या खासगी रुग्णालयात नेऊन सोडण्यात आले. त्या रुग्णालयाने या महिलेस दाखल करून घेण्यास नकार दिल्यानंतर तिच्या मुलाला फोन करून तिला तिच्या खारच्या पत्त्यावर पोहोचवण्यात आले.खार येथे राहाणाऱ्या अनुसया सावंत (७८) या महिलेला मेंदूचा पक्षाघात झाल्याने तिच्या नातेवाईकांनी तिला उपचारासाठी बोरिवली येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. प्रकृतीत सुधारणा होत असतानाच तिला करोनाची लागण झाल्याची माहिती रुग्णालयाने नातेवाईकांना दिली. याबाबत नातेवाईकांनी पालिकेला कळवल्यानंतर पालिकेने त्वरित आपली रुग्णवाहिका खासगी रुग्णालयात पाठवून या महिलेला भगवती रुग्णालय येथे दाखल करून घेतले. दहा दिवसांच्या उपचारानंतर ही महिला बरी झाली. दहाव्या दिवशी एका रुग्णवाहिकाद्वारे या महिलेला यापूर्वी उपचार घेतलेल्या बोरिवलीतील खासगी रुग्णालयात पुन्हा नेण्यात आले. या महिलेला तिच्या घरी सोडण्याऐवजी रुग्णालयात कशासाठी आणले, तिला घरी सोडले आहे, त्यामुळे आम्ही पुन्हा रूग्ण घेणार नाही, असे संबंधित रुग्णालयाने पालिकेला कळवले. त्यानंतर पालिकेने केस पेपरवरील महिलेच्या मुलाच्या मोबाइलवर संपर्क करून महिलेला खार येथील घरी आणून सोडले.
अजब नियमाकडे बोटपालिकेच्या भगवती रुग्णालयातील संबंधित डॉक्टरकडे विचारणा केली असता, रुग्ण जिथून रुग्णालयात आणला जातो, त्याच ठिकाणी पुन्हा सोडण्याचा पालिकेचा नियम आहे. त्यानुसार त्या रुग्णाला सोडले होते. मात्र रुग्णालयाने रुग्ण घेण्यास नकार दिल्याने त्यांच्या घरच्या पत्त्यावर नेऊन सोडण्यात आले, अशी माहिती या डॉक्टरने दिली.घरी सोडण्याबाबतची माहिती नाहीपालिकेच्या या भोंगळ कारभारावर रुग्णाच्या नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. रुग्णाला दाखल केल्यानंतर एकदाही भेटायला देण्यात आले नाही. त्यामुळे रुग्णाची प्रकृती कशी आहे, आम्हाला काहीच कळू शकले नाही. ज्या दिवशी घरी सोडणार आहे, याची पूर्वकल्पना देखील पालिकेने आम्हाला दिलेली नाही. केसपेपरवर खार येथील पत्ता नमूद केलेला असताना खासगी रुग्णालयात का घेऊन गेले, असा सवाल या महिलेचा मुलगा दिलीप सावंत यांनी केला आहे. खासगी रुग्णालयाने रुग्ण पुन्हा घेण्यास नकार दिल्यानंतर पालिकेने आमच्याशी संपर्क साधला, हा अनुभव भयंकर असल्याचा सावंत यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment