India 24Hours news

India News: Get latest news & live updates from India, live India news headlines, breaking news India. Read all latest India news & top news on India Today.

Breaking

Post Top Ad

Monday, June 8, 2020

India China war: Latest News & Videos, Photos about India ...लडाख सीमावाद: चीनकडून रणगाड्यांसह युद्ध सराव

लडाख सीमावाद: चीनकडून रणगाड्यांसह युद्ध सराव

India China war: Latest News & Videos, Photos about India ...लडाख सीमावाद: चीनकडून रणगाड्यांसह युद्ध सराव

लडाखमधील सीमा भागात भारत आणि चीनच्या सैन्यात तणाव निर्माण झाला आहे. हा तणाव निवळण्यासाठी लष्करी पातळीवर चर्चा सुरू असतानाच चीनकडून भारतावर दबाव निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

 
India China war: Latest News & Videos, Photos about India
India China war: Latest News & Videos, Photos about India

बीजिंग: लडाख सीमा भागात तणाव सुरू असताना चीनकडून भारतावर दबाव टाकण्यास सुरुवात झाली आहे. एका बाजूला सीमेवरील तणाव निवळण्यासाठी लष्करी अधिकाऱ्यांच्या चर्चा सुरू ठेवायच्या आणि दुसरीकडे युद्ध सराव करण्याचे दुहेरी धोरण चीनने आखले आहे. चीनने नुकत्याच आपल्या रणगाड्यांचा युद्ध सराव केला असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

चीन सरकारच्या ग्लोबल टाइम्स या वृत्तपत्राने ट्विटरवर हॅण्डलवर चिनी सैन्याचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीने मध्य चीनमधील हुबेई प्रातांतील उत्तर-पश्चिम क्षेत्रात हजारो पॅराट्रूपर्स आणि चिलखती वाहनांसह युद्ध सराव केला. यामध्ये रणगाड्यांचाही समावेश करण्यात आला होता. या युद्ध सरावा दरम्यान, सीमा भागातील युद्धकाळात वेगाने शस्त्र आणि सैन्याला अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. चिनी सैन्य पूर्णपणे तयार असून अवघ्या काही तासात ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असल्याचे चिनी तज्ञांनी सांगितले. चायना सेंट्रल टेलिव्हिजनने(सीसीटीव्ही) सांगितले की, शनिवारी भारतालगतच्या सीमेवरील एका अज्ञात भागात चिनी सैन्याच्या हवाई दलाने एअरबोर्न ब्रिगेडने नागरी विमान वाहतूक, लॉजिस्टीक ट्रान्सपोर्टेशन चॅनल आणि रेल्वेच्या माध्यामातून हजारो पॅराट्रूपर्सना तैनात केले आहे.





वाचा: चीनला धक्का! अमेरिकेकडून जिनपिंग यांच्या 'या' स्वप्नाला सुरुंग
हुबेई प्रांत हा या वर्षाच्या सुरुवातीला करोनाच्या संसर्गाने सर्वाधिक प्रभावित झालेला प्रांत होता. सध्या या प्रांतात करोनावर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश मिळाले आहे. त्यामुळेच या भागात चिनी फौजांना युद्ध सरावासाठी उतरवण्यात आले असल्याचे सीसीटीव्हीने सांगितले. चिनी लष्कराने केलेल्या युद्धसरावात शेकडो चिलखती वाहने, रणगाडे, तोफा आणि मिसाइल ब्रिगेड यांचा सहभाग होता. सीमेवर निर्माण झालेला तणाव हा चर्चेच्या माध्यमातून सोडवण्यात येणार असल्याचे चीनने जाहीर केले होते. मात्र, दुसऱ्या बाजूला युद्ध सराव सुरू असल्यामुळे चीनच्या एकूणच भूमिकेवर शंका व्यक्त केली जात आहे

No comments:

Post a Comment

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Post Top Ad

Your Ad Spot

Pages