Health Benefits Of Salad : पोटदुखी आणि बद्धकोष्ठतेची समस्या होईल दूर, फक्त सलाड खाण्याची योग्य पद्धत जाणून घ्या!
सलाड खाणं आपल्या सर्वांनाच खूप आवडतं. मग सलाड फळांचं असो वा भाज्यांचं किंवा मग दोन्ही मिळून तयार केलेलं असो. आता हे झालं
आवडीनिवडीबाबत पण तुम्हाला माहित आहे का? आपल्यापैकी ब-याचजणांना सलाड खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत माहितच नसते.
त्यामुळे सलाड खाण्याचा कोणताही लाभ आपल्या
शरीराला मिळतच नाही.
Health Benefits Of Salad : पोटदुखी आणि बद्धकोष्ठतेची समस्या होईल दूर, फक्त सलाड खाण्याची योग्य पद्धत जाणून घ्या! |
सलाड का खावे?
Health Benefits Of Salad : पोटदुखी आणि बद्धकोष्ठतेची समस्या होईल दूर, फक्त सलाड खाण्याची योग्य पद्धत जाणून घ्या! |
सलाड खाल्ल्याने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. कारण सलाड हे फायबरने संपन्न असते. यात असणारी फळे आणि पालेभाज्या आपल्या शरीराला विविध प्रकारची अत्यावश्यक तत्व प्रदान करतात. यामुळे खाल्लेले अन्न नीट पचायला मदत होते आणि शरीराची रोगप्रतिकार शक्ती सुद्धा मजबूत होते. फायबर युक्त असण्यासोबत आंबट फळे सायट्रिक अॅसिडने भरपूर असतात. यामुळे आपले पचन तंत्र आणि आतड्या साफ राहण्यास मदत मिळते. याशिवाय कमजोर झालेल्या त्वचेच्या अंतर्गत आणि बाह्य पेशी सुद्धा मजबूत होतात.
सलाडमुळे लिव्हर राहते फिट
Health Benefits Of Salad : पोटदुखी आणि बद्धकोष्ठतेची समस्या होईल दूर, फक्त सलाड खाण्याची योग्य पद्धत जाणून घ्या! |
लिव्हरला निरोगी राखण्यासाठी तुम्ही हंगामी फळे न चुकता नक्की खाल्ली पाहिजेत. जसे की उन्हाळ्यात काकडी, राताळे, कांद्याची पात आणि सोबत लिंबू आणि टोमॅटो सुद्धा खावे. हिवाळा आला की गाजर, मुळा, पत्ता कोबी, केळी इत्यादी फळे आवर्जुन खावीत. सलाड खाल्ल्याने आपल्या शरीराला आवश्यक प्रमाणात फायबर मिळते. यामुळे लिव्हरला जेवण पचवण्यास मदत होते. या व्यतिरिक्त आतड्यांची मल साफ करण्याची प्रक्रिया सुद्धा अतिशय सुधारते. हा फायदा पाहता प्रत्येकाने सलाड आवर्जुन खायला हवेच.
डिहाइड्रेशनपासून बचाव
तुम्ही हवं तर नियमित रूपाने फळांचे सलाड खा किंवा भाज्यांचे सलाड खा. पण सलाड हे नक्की खा. जर तुम्ही दोन्ही सलाड दिवसाला खात असाल तर वेगवेगळ्या वेळी दोन्ही सलाडचे सेवन करा. फळे आणि भाज्या खाल्ल्याने शरीरात पाण्याची कमी होत नाही. उन्हाळ्याच्या काळात फळे आणि भाज्यांचे सलाड आपल्या शरीरातील आर्द्रतेचा स्तर राखून ठेवतात. जे लोक न चुकता रोज सलाडचे सेवन करतात त्यांना उन्हाळ्याच्या काळात लघुशंकेची समस्या सुद्धा उद्भवत नाही. याशिवाय हे लोक नेहमी उत्स्फूर्त राहतात. हवं तर तुम्हीही रोज सलाड खा, तुम्हालाही हा फरक नक्की दिसून येईल.
सलाड खाण्याचा महत्त्वाचा नियम
आपल्याकडे सलाड हे जेवणासोबत खाण्याची पद्धत आहे जे की एक प्रकारे चूक आहे. हो खरंच, सलाड हे जेवणासोबत कधीच खाऊ नयेत. तुम्हाला सलाड खायचे असेलच तर हे जेवणाच्या एक तास आधी किंवा दिवसभर छोटी मोठी भूक लागल्यावरच सलाड खावे. जर तुम्ही हि योग्य पद्धत अवलंबत नसाल तर तुमच्या सलाड खाण्याचा जास्त फायदा होणार नाही. म्हणून सलाड योग्य पद्धतीने योग्य वेळीच खावे.
जेवणासोबत सलाड का खाऊ नये?
Health Benefits Of Salad : पोटदुखी आणि बद्धकोष्ठतेची समस्या होईल दूर, फक्त सलाड खाण्याची योग्य पद्धत जाणून घ्या! |
आपण सहसा गरम जेवणच खातो. म्हणजेच जेवणातील पदार्थाचे तापमान जास्त असते आणि आपण जे सलाड सोबत खातो त्याचे तापमान थंड असते कारण आपण सहसा फळे आणि भाज्या या फ्रीजमध्ये ठेवतो. असे विरोधाभासी तापमानातले पदार्थ खाल्ल्याने दातांना नुकसान पोहचू शकते. या शिवाय पचनक्रिया देखील संथ गतीने होते. जेवण आणि सलाड एकत्र खाल्ल्याने पचनतंत्र आणि आतड्यांवर अधिक दबाव पडतो. कारण वेगवेगळ्या पदार्थांना पचवण्यासाठी लिव्हरला त्याच प्रकारचे एंजाइम्सचे सिक्रेशन करावे लागते. जेणेकरून जेवण नीट पचू शकेल. म्हणून मंडळी या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून सलाडचे योग्य वेळी योग्य प्रकारे सेवन करा आणि निरोगी व सुदृढ राहा. आपल्या मित्रमंडळींसोबत सुद्धा ही अमुल्य माहिती शेअर करा.
No comments:
Post a Comment