happy birthday raj thackeray unknown facts and rare photos of raj thackrey
‘हॅप्पी बर्थ डे राज ठाकरे’, समजून घ्या राजकारणापलीकडचे मनसे अध्यक्ष
1 / 15राज ठाकरे यांचे मूळ नाव स्वरराज श्रीकांत ठाकरे असून त्यांचा जन्म १४ जून १९६८ रोजी मुंबईत झाला. राज ठाकरे यांचे संपूर्ण शालेय शिक्षण दादरच्या बालमोहन विद्यालयात झाले. (सर्व फोटो सौजन्य : इंस्टाग्राम / सोशल मीडिया )- happy birthday raj thackeray unknown facts and rare photos of raj thackrey
happy birthday raj thackeray date happy birthday raj thackeray raj thackeray birthday photo raj thakre birthday photo raj saheb thakre birthday raj thackeray birthday raj thakre birthday raj thackeray birth date raj thakare birth date.
2 / 15राज ठाकरे यांचे वडिल श्रीकांत ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे हे सख्खे भाऊ.
3 / 15व्यंगचित्रांबरोबर राज ठाकरेंना तबला, गिटार आणि व्हायोलिनही वाजवता येते. बालपणी त्यांनी ही वाद्य वाजवण्याचे प्रशिक्षण घेतले.
4 / 15व्यंगचित्र, राजकारणाबरोबर राज ठाकरेंना चित्रपट आणि फोटोग्राफी या क्षेत्राचीही विशेष आवड आहे. राज यांना चित्रपट पाहायला आवडतात. मराठी चित्रपट सृष्टीबरोबर बॉलिवूडमध्येही त्यांचे उत्तम संबंध आहे.
5 / 15राज ठाकरे यांचे वडील श्रीकांत ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे हे सख्खे भाऊ. संगीत क्षेत्राची आवड असलेल्या श्रीकांत ठाकरे संगीतकार म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली. मार्मिकच्या उभारणीत त्यांचे महत्वपूर्ण योगदान होते.
6 / 15राज ठाकरे यांची आई कुंदा ठाकरे आणि दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी स्वर्गीय मिनाताई ठाकरे या सुद्धा सख्ख्या बहिणी आहेत.
7 / 15राज ठाकरे आणि सचिन तेंडुलकर चांगले मित्र आहेत.
8 / 15लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रसिद्ध होणाऱ्या राज ठाकरे यांच्या व्यंगचित्रांचा भाजपानेही धसका घेतला होता. म्हणूनच पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्यावर रेखाटलेल्या प्रत्येक व्यंगचित्राला भाजपा समर्थकही व्यंगचित्रातून उत्तर देत होते.
9 / 15राज ठाकरे यांच्या मुलाचा अमितचा मागच्यावर्षी मिताली बोरुडे बरोबर विवाह झाला. त्या सुद्धा फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रात आहेत.
10 / 15राज ठाकरे आज राजकारणी असले तरी मूळचे ते व्यंगचित्रकार आहेत. व्यंगचित्राचा हा वारसा त्यांना काका बाळासाहेब ठाकरेंकडून मिळाला आहे.
11 / 15मुंबईच्या जे.जे.स्कूल ऑफ आर्टसमधून चित्रकलेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मार्मिक नियतकालिक आणि सामना या वर्तमानपत्रासाठी व्यंगचित्रे काढली.
12 / 15राज ठाकरेंच्या राजकारणाची सुरुवात शिवसेनेतून झाली. त्यांना राजकारणाचे बाळकडू घरातूनच मिळाले. काका आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्वत:बरोबर त्यांना सभेसाठी घेऊन जायचे.
13 / 15२००६ मध्ये त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली व ९ मार्च २००६ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची स्थापना केली.
14 / 15२००८ मध्ये मराठीचा मुद्दा उचलून धरल्यानंतर त्यांना मोठया प्रमाणावर जनसमर्थन मिळाले. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे १३ आमदार निवडून आले.
15 / 15आता राज यांनी पक्षाच्या झेंडयाचा रंग बदलला असून, हिंदुत्वाची वाटेवरुन एक नवा प्रवास सुरु केला आहे.
No comments:
Post a Comment