Devendra Fadnvis News
मी पुन्हा येईन म्हणाले, पण न आल्यामुळे 'ते' फ्रस्ट्रेट : रामदास कदम
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam slams Devendra Fadnavis) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
मी पुन्हा येईन म्हणाले, पण न आल्यामुळे 'ते' फ्रस्ट्रेट : रामदास कदम |
रत्नागरी : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam slams Devendra Fadnavis) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. महाविकास आघाडी सरकार वादळसदृश्य भागात पोहोचत नसल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. याशिवाय राज्य सरकारची नुकसानग्रस्त भागात अजूनही मदत पोहोचलेली नाही, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यांच्या याच दाव्याला रामदास कदम यांनी प्रत्युत्तर दिलं (Ramdas Kadam slams Devendra Fadnavis).
“महाविकास आघाडी सरकारला बदनाम कसं करता येईल, एव्हढंच देवेंद्र फडणवीस यांना माहिती आहे. खरंतर देवेंद्र फडणवीस ‘मी पुन्हा येईल’ असं म्हणाले आणि न आल्यामुळे फ्रस्ट्रेट झाले आहेत”, असा टोला रामदास कदम यांनी लगावला.
निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणात प्रचंड नुकसान झालं आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगड जिल्ह्यात जावून नुकसानग्रस्त भागांची पाहणी करुन रायगडला 100 कोटींची मदत जाहीर केली आहे. याशिवाय रत्नागिरी जिल्ह्याला 75 कोटी आणि सिंधुदुर्गला 25 कोटींची मदत जाहीर केली.
मुख्यमंत्र्यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्या पाहणीनंतर देवेंद्र फडणवीसांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.
देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानग्रस्त कोकण भागाची पाहणी करत असताना पत्रकार परिषद घेत राज्य सरकावर टीका केली. “चक्रीवादळाने वाताहात होऊन 10 दिवस होऊन गेले. मात्र, सरकारने केलेल्या घोषणांची कुठेही अंमलबजावणी झालेली नाही”, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.
याशिवाय “चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांना लोकांना
जिथं ठेवलं आहे त्याची अवस्था खुराड्यासारखी आहे.
अत्यंत वाईट अवस्थेत लोकांना ठेवण्यात आलं आहे”, अस दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
No comments:
Post a Comment