India 24Hours news

India News: Get latest news & live updates from India, live India news headlines, breaking news India. Read all latest India news & top news on India Today.

Breaking

Post Top Ad

Saturday, June 13, 2020

No garlands, no cakes, Aditya Thackeray's big decision after Raj Thackeray..................

Aaditya Thackeray | .....


No garlands, no cakes, Aditya Thackeray's big decision after Raj Thackeray

नको हार-तुरे, नको केक, राज ठाकरेंपाठोपाठ आदित्य ठाकरेंचाही मोठा निर्णय


पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. (Aaditya Thackeray will not celebrate his Birthday)
Aaditya Thackeray | नको हार-तुरे, नको केक, राज ठाकरेंपाठोपाठ आदित्य ठाकरेंचाही मोठा निर्णय

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापाठोपाठ पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस उद्या म्हणजे 13 जूनला तर राज ठाकरे यांचा वाढदिवस 14 जूनला आहे. मात्र राज ठाकरे यांनी 14 जून रोजी आपला वाढदिवस अत्यंत साधेपणाने कुटुंबासोबतच साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. तर आदित्य ठाकरे यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. (Aaditya Thackeray will not celebrate his Birthday)


आदित्य ठाकरे यांनी पत्रक प्रसिद्ध करुन याबाबतची माहिती दिली. यामध्ये आदित्य ठाकरे म्हणतात, “राज्यासह जगावर कोरोनाचं संकट आहे. आपण गेल्या दोन-तीन महिन्यांपासून त्याचा सामना करत आहोत. या कोरोनावर मात करणं हे आपलं ध्येय आहे. 13 जूनला माझा वाढदिवस आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मी वाढदिवस साजरा न करण्याचं ठरवलं आहे. तुम्ही जिथे असाल, तिथूनच मला शुभेच्छा द्या”.


हार-तुरे, होर्डिंग किंवा केकचा खर्च टाळून तो कोरोना संकटात अडकलेल्यांवर करा किंवा मुख्यमंत्री सहाय्यता निधीत द्या, असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी केलं. तसंच तुम्ही सर्वजण कोरोनापासून सर्वांची काळजी घ्या, हीच माझ्यासाठी खरी भेट असेल, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे यांचं आवाहन

“मला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला येऊ नका. तुम्ही जिथे आहात तिथे जनतेला मदत करा, दिलासा द्या, याच माझ्यासाठी शुभेच्छा आहेत” असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. राज ठाकरे यांनी 14 जून रोजी आपला वाढदिवस अत्यंत साधेपणाने कुटुंबासोबतच साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी राज ठाकरे यांनी लिहिलेले पत्र ट्विटरवर शेअर केले आहे.

राज ठाकरेंच्या ताफ्यातील पोलिसांची कोरोनावर मात

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानापर्यंत कोरोनाने धडक दिल्याची माहिती आहे. राज ठाकरे यांच्या सुरक्षा रक्षकांच्या ताफ्यातील दोन पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता.  या दोन पोलिसांनी करोनावर मात केली आहे. हे पोलीस कर्मचारी उपचारानंतर बरे होऊन आता कोरोनामुक्त झाले आहेत.

(Aaditya Thackeray will not celebrate his Birthday)

No comments:

Post a Comment

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Post Top Ad

Your Ad Spot

Pages