India 24Hours news

India News: Get latest news & live updates from India, live India news headlines, breaking news India. Read all latest India news & top news on India Today.

Breaking

Post Top Ad

Monday, June 8, 2020

coronavirus vaccine news | गायीच्या मदतीने होणार करोनाबाधितांवर उपचार!

 coronavirus vaccine news............,

coronavirus antidote in hindi......,

गायीच्या मदतीने होणार करोनाबाधितांवर उपचार!

करोनाबाधितांच्या उपचारासाठी अॅण्टीबॉडीसह, प्लाज्मा थेरेपी व इतरही पर्यायांचा वापर करण्यात येत आहे. अमेरिकेत एका कंपनीकडून गाईंच्या अॅण्टीबॉडीपासून विषाणूचा संसर्ग रोखता येईल, याबाबत चाचपणी सुरू झाली असून क्लिनिकल चाचणी करण्यात येणार आहे.

गायीने होणार करोनाबाधितांवर उपचार

गायीने होणार करोनाबाधितांवर उपचार

वॉशिंग्टन:करोना विषाणू संसर्गावर उपचार शोधण्यासाठी जगभरातील संशोधकांकडून प्रयत्न सुरू आहेत. अमेरिकेतील बायोटेक कंपनी SAb Biotherapeutics ने करोनाबाधितांच्या उपचारासाठी गायींची मदत घेतली आहे. या कंपनीच्या संशोधकांनी गायीच्या शरीरातून अॅण्टीबॉडीतून विकसित केली असून SARS-CoV-2 च्या संसर्गाविरोधात ही लस प्रभावी ठरणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
अॅण्टीबॉडी तयार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या गायींमध्ये जनुकीय बदल करण्यात आलेत. कंपनी आता गायींपासून विकसित करण्यात आलेल्या अॅण्टीबॉडीची क्लिनिकल चाचणी करणार आहे. गायीच्या शरीरात एका महिन्यात ही अॅण्टीबॉडी विकसित होते. एका महिन्यात तयार होणाऱ्या या अॅण्टीबॉडीपासून शेकडो रुग्णांवर उपचार करता येणे शक्य असल्याचा दावा कंपनीने केला आहे. प्लाज्मा उपचार पद्धतीपेक्षा हे उपचार चार पटीने अधिक चांगले असल्याचा दावा कंपनीने केला आहे.


वाचा: करोनाचा संसर्ग खवले मांजरातून? चीनने उचलले 'हे' पाऊल!

विज्ञानविषयक नियतकालिकात प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, या गायींच्या अॅण्टीबॉडीपासून विषाणूचा संसर्ग रोखता येऊ शकतो. मर्सच्या आजारानंतर SAb Biotherapeutics या पद्धतीच्या उपचारावर संशोधन करत होते. SARS-CoV-2 विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर गायींच्या शरीरात एका आठवड्यातच अॅण्टीबॉडी तयार होण्यास सुरुवात झाली होती.


वाचा: ऑक्सफोर्ड विद्यापीठाची करोना लस; पुण्यातील 'ही' कंपनी करणार उत्पादन

SAb Biotherapeutics कंपनीचे संशोधक गायींमध्ये जनुकीय बदल करतात. रक्तात अॅण्टीबॉडी विकसित होण्याआधी गायींना विषाणूंच्या जीनोमवर आधारीत डीएनएची लस देण्यात येते. त्यामुळे त्यांच्या इम्युन सिस्टीम तयार होते. त्यानंतर SARS-CoV-2चे स्पाइक प्रोटीन दिले जाते. त्यामुळे अॅण्टीबॉडी तयार होतात.


वाचा: 'या' महिन्यात करोनावर लस; चीन करणार मोठी घोषणा
SAb Biotherapeuticsचे अध्यक्ष आणि सीईओ एडी सुलिवन यांनी सांगितले की, गायी या अॅण्टीबॉडी कारखान्यासारख्या आहेत. शरीरात इतर लहान प्राण्यांच्या तुलनेत अधिक रक्त असते. त्यांच्या रक्तात माणसांच्या तुलनेत दुप्पट अॅण्टीबॉडी असते. त्याशिवाय, गायी अनेक प्रकारच्या पॉलिक्लोनल अॅण्टीबॉडी विकसित करतात. त्या विषाणूंच्या विविध भागांवर हल्ला करतात.
coronavirus news,
coronavirus india,
coronavirus vaccine news,

No comments:

Post a Comment

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Post Top Ad

Your Ad Spot

Pages