Aaditya Thackeray Birthday |
स्वतःच्या वाढदिवशी दिशा पटाणीचे आधी आदित्य ठाकरेंना बर्थडे ट्वीट
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटाणी आज आपला 28 वा वाढदिवस साजरा करत आहे. तर आदित्य ठाकरेंचा हा 30 वा जन्मदिवस. (Actress Disha Patani Birthday wishes to Aditya Thackeray)
Aaditya Thackeray Birthday |
मुंबई : पर्यावरण मंत्रिपदाची धुरा स्वीकारल्यानंतर आलेला पहिला वाढदिवस जोरदार साजरा करण्याची संधी आदित्य ठाकरे यांना आज (13 जून) होती. मात्र कोरोनाच्या संकटामुळे आदित्य यांनी साधेपणाने वाढदिवस करण्याचा निर्णय घेतला आहे. बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटाणी हिनेही आदित्य ठाकरेंना बर्थडेनिमित्त ट्वीट केले. विशेष म्हणजे आजच दिशाचाही वाढदिवस असतो. (Actress Disha Patani Birthday wishes to Aditya Thackeray)
आदित्य ठाकरे यांच्यासोबत डिनरमुळे दिशा पटाणी गेल्या वर्षभरापासून चर्चेत आहे. दिशा आज आपला 28 वा वाढदिवस साजरा करत आहे. तर आदित्य ठाकरेंचा हा 30 वा जन्मदिवस. दोघांच्या मैत्रीविषयी कुणीही उघडपणे बोलत नसलं, तरी अनेक पत्रकार आदित्य ठाकरे यांना “आपल्या आयुष्याला नवी ‘दिशा’ कधी मिळणार?” असे आडूनआडून प्रश्न विचारात गुगली टाकतात.
“वाढदिवसाच्या शुभेच्छा, आहेस तसाच अमेझिंग राहा आणि चमकत राहा” अशा आशयाचे ट्वीट दिशा पटाणीने केले आणि पुन्हा सर्वांच्या भुवया उंचावल्या.
(Actress Disha Patani Birthday wishes to Aditya Thackeray)
दिशा पटाणीचा हटके अंदाज
दिशा पटाणी एम एस धोनीवरील चित्रपटातून बॉलीवूडमध्ये आली. तिचे बागी, भारत, मलंग असे मोजके चित्रपट गाजले. मात्र दिशा कधी तिच्या हटके लूकमुळे, कधी कपड्यांमुळे, तर कधी अभिनेता टायगर श्रॉफमुळे चर्चेत असते. ट्विटर, इन्स्टाग्रामवर दिशा तिचे फोटो शेअर करत असते. त्यावरुन तिच्याबद्दल सोशल मीडियावर नेहमीच चर्चा सुरु असते.
हेही वाचा : Aaditya Thackeray | जन्मतःच हृदयात तीन ब्लॉक, अर्भकाला मदतीचा हात, आदित्य ठाकरेंचे वाढदिवशी स्तुत्य पाऊल
अभिनेता टायगर श्रॉफसोबतच्या कथित अफेअरबाबत ती चर्चेत होती. अशातच दिशा आदित्य ठाकरे यांच्यासोबत डिनरला गेल्याचे फोटो गेल्या वर्षी सोशल मीडियावर शेअर झाल्यानंतर चर्चेला उधाण आलं. दोघांचा वाढदिवस एकाच दिवशी असल्याने एकत्र सेलिब्रेशन करणार का, अशा प्रश्नांना गेल्या वर्षापासून ऊत आला.
खरं तर दिशा पटाणीचं नाव कायमच अभिनेते जॅकी श्रॉफ यांचा मुलगा अभिनेता टायगर श्रॉफ याच्यासोबत जोडलं गेलं. मात्र, या दोघांनी कधीच त्यांच्यातील नात्याला दुजोरा दिला नाही. त्यामुळे सोशल मीडियावरील चर्चा केवळ ‘गॉसिप्स’च राहिली.
(Actress Disha Patani Birthday wishes to Aditya Thackeray)
No comments:
Post a Comment