Balasaheb Thorat | ...........
There are differences between the three siblings, ours and the three-party government: Balasaheb Thorat
तीन भावंडांमध्ये मतभेद असतात, आमचं तर तीन पक्षाचं सरकार : बाळासाहेब थोरात
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण सोमवारी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत. (Balasaheb Thorat Ashok Chavan to meet CM Uddhav Thackeray over Congress Party issues)
Balasaheb Thorat |
रायगड : तीन भावंडांमध्ये मतभेद असतात, आमचं तर तीन पक्षाचं सरकार आहे, असं सूचक उत्तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिलं. सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचंही थोरातांनी सांगितलं. सत्तेत सहभागी असूनही काँग्रेसला विचारात घेतले जात नसल्याने पक्षाचे नेते नाराज आहेत. (Balasaheb Thorat Ashok Chavan to meet CM Uddhav Thackeray over Congress Party issues)
“मी आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत. सोमवारी आम्ही उद्धव ठाकरे यांची भेट घेऊ. पक्षांमध्ये मतभेद असतात आणि प्रत्येकाला तसा अधिकारही आहे. मात्र मुख्यमंत्र्यांशी बोलून या सर्व गोष्टी आम्ही सोडवणार आहोत” असं बाळासाहेब थोरात यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी एक्स्क्लुझिव बातचीत करताना सांगितलं.
काँग्रेसला निर्णय प्रकियेत सहभागी करुन घेणे आणि इतर मुद्यावर थोरात आणि चव्हाण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत.
काँग्रेसच्या मंत्र्यांच्या अनुभवाचा फायदा घेतला जात नाही, निर्णय प्रक्रियेत घेत नाही, यावरुन काँग्रेसमध्ये नाराजी आहे. बाळासाहेब थोरात यांनी याधीही भावना व्यक्त केल्या होत्या. चार दिवसांपूर्वी मंत्री सुनील केदार यांच्या बंगल्यावर झालेल्या बैठकीला प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, मंत्री वर्षा गायकवाड, सतेज पाटील यांच्यासह काँग्रेसचे सर्व दिग्गज नेते उपस्थित होते.
आमच्या मागण्या आहेत त्या महाराष्ट्राच्या हिताच्या आहेत, आमच्या वैयक्तिक मागण्या नाहीत, त्याबाबतही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करु, असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं होतं. (Balasaheb Thorat Ashok Chavan to meet CM Uddhav Thackeray over Congress Party issues)
No comments:
Post a Comment