India 24Hours news

India News: Get latest news & live updates from India, live India news headlines, breaking news India. Read all latest India news & top news on India Today.

Breaking

Post Top Ad

Saturday, May 30, 2020

ही १३ शहरं सोडून देशातील इतर भागाची लॉकडाऊनपासून सुटका? | Maharshtra News |India 24 hours News

देशव्यापी लॉकडाऊन सुरू होऊन आज (३० मार्च) ६७ दिवस होत आहेत. लॉकडाऊनचा चौथा टप्पा येत्या रविवारी ३१ मार्च रोजी संपुष्टात येतोय. आता पुढे 'लॉकडाऊन' या शब्दापासून थोडं लांब राहण्याचा सरकारकडून प्रयत्न होतंय. त्यामुळे, १ जूनपासून देशव्यापी लॉकडाऊन कायम न राहता हे केवळ देशातील सर्वाधिक संक्रमित १३ शहरांच्या ठिकाणांपर्यंत सीमित राहू शकतं. ही ठिकाणं सोडून इतर शहरांतून लॉकडाऊन हटवला जाऊ शकतो.
ही १३ शहरं सोडून देशातील इतर भागाची लॉकडाऊनपासून सुटका?
ही १३ शहरं सोडून देशातील इतर भागाची लॉकडाऊनपासून सुटका?

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून एक नव्या गाईडलाईन्स (New Guidelines) आखण्याचं काम सुरू आहे. यानुसार, १ जूनपासून देशातील बहुतांश ठिकाणी लॉकडाऊन उठवण्यात येईल. 'इकोनॉमिक टाईम्स'नं दिलेल्या माहितीनुसार, देशातील केवळ १३ शहरांत सोडून देशातील इतर भागांची मात्र लॉकडाऊनमधून सुटका होऊ शकते. हॉटेलमॉल्स आणि रेस्टॉरन्ट देखील १ जूनपासून उघडण्याची परवानगी दिली जाऊ शकते.रुवारी वेगवेगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर गृह मंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या दरम्यान दोन्ही नेत्यांनी नव्या गाईडलाईन्स संदर्भात चर्चाही केली. ३१ मे रोजी येत्या १५ दिवसांसाठी लागू करण्यात येणारे दिशानिर्देश जाहीर केले जाऊ शकतात.

वाचा : Live : करोना व्हायरस आणि लॉकडाऊन अपडेट


सर्वाधिक संक्रमण आढळलेली शहरं अर्थात, मुंबई, ठाणे, पुणे, दिल्ली, चेन्नई, अहमदाबाद, कोलकाता/हावडा, इंदोर, जयपूर, जोधपूर, चेंगलपट्टू आणि तिरुवलूरमध्ये लॉकडाऊनचे नियम यापुढेही सुरू राहू शकतात.

हॉटेल, मॉल्स, रेस्टॉरन्ट १ जूनपासून उघडण्यासाठी परवानगी दिली जाऊ शकते. देशात सध्या हॉटेल्स सोडून हॉस्पीटॅलिटी सेवा संपूर्णत: ठप्प आहे. तसंच पोलीस, अधिकारी आणि आरोग्य सेवा यंत्रणा कार्यरत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, १ जूनपासून सार्वजनिक ट्रान्सपोर्ट सेवा सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांसहीत सुरू केली जाऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी होणाऱ्या 'मन की बात' या कार्यक्रमात लॉकडाऊनच्या पुढच्या टप्प्याबद्दल काही बाबी स्पष्ट करू शकतात

वाचा : या १३ शहरांनी संपूर्ण देशाची चिंता वाढवली

No comments:

Post a Comment

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Post Top Ad

Your Ad Spot

Pages