लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर करोनाचे रुग्ण वाढले: रोहित पवार
लॉकडाऊन पूर्णपणे उठल्यानंतर राज्यातील करोनाचे रुग्ण वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळं आपल्याला त्यासाठी तयारी करावी लागेल, असं मत रोहित पवार यांनी व्यक्त केलंय.
अहमदनगर:
'करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी करण्यात आलेलं लॉकडाऊन शिथिल केल्यामुळं आपल्याकडं रुग्ण वाढले आहेत. लॉकडाऊन उठल्यानंतर त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्या परिस्थितीला सामोरं जाण्याची तयारी आपल्याला ठेवावी लागेल. राज्यात
कोरोना
चाचण्यांमध्ये आणखी वाढ करावी लागेल,' असं स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार
यांनी व्यक्त केलं आहे.
No comments:
Post a Comment