पंतप्रधान मोदी यांनी दिल्या शुभेच्छा!| india news pm modi eid wish पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या शुभेच्छा
नवी दिल्ली: आज जगभरात रमजान ईद साजरी केली जात आहे. लॉकडाउनच्या काळात साजरा होत असलेल्या या सणानिमित्त लोक सोशल मीडियाद्वारे एकमेकांना शुभेच्छा देत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आज सोमवारी सकाळी देशातील जनतेला शुभेच्छा देत ट्विट केले आहे. ईद-उल-फित्रनिमित्त शुभेच्छा, या विशेष दिनी करुणा, बंधुभाव आणि सद्भावाने पुढे जाऊया. सर्व लोकांना चांगले आरोग्य लाभो, सर्वांना समृद्धी मिळो, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
या वर्षीची ईद अतिशय वेगळी असेल असे केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी रविवारी म्हटले आहे. लोक यंदा पहिल्यांदाच घरात राहून ईद साजरी करत आहेत. मात्र, आज सणाची चमक जराही कमी होणार नाही, असे नक्वी म्हणाले. सगळीकडे कोविड-१९ चा प्रकोप सुरू असल्याने आम्ही सर्वजण घरातच ईद साजरी करू, घरातच नमाज पढू, मात्र यामुळे आम्ही या सणाची चमक जराही कमी होऊ देणार नाही. देश लवकरात लवकर करोनामुक्त व्हावा, अशी आम्ही प्रार्थना करू, असे केंद्रीय मंत्री नक्वी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले आहे. इतर केंद्रीय मंत्री आणि विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही ईदीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनीही ईद-उल-फित्रनिमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. रमजान महिन्याच्या समाप्तीवर हे पर्व आनंद घेऊन येत असतो. या वेळी मात्र करोनाच्या प्रकोपामुळे एकमेकांना भेटून हा सण साजरा करता येत नाही. सोशल डिस्टन्सिंग पाळून सर्वच समुदाय आपापले सण आणि पर्व साजरे करत आहेत. ईदीनिमित्त पारंपरिक सद्भाव आणि बंधुभाव मजबूत बनवत हा सण साजरा करण्याचे मी आग्रह करत आहे, अशा शब्दात शिवराजसिंह चौहान यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
For More News Read Also https://india24hoursnews1.blogspot.com/
|
No comments:
Post a Comment