India 24Hours news

India News: Get latest news & live updates from India, live India news headlines, breaking news India. Read all latest India news & top news on India Today.

Breaking

Post Top Ad

Saturday, May 30, 2020

शरद पवार, उद्धव ठाकरेंमध्ये बैठका; महाराष्ट्रातील लॉकडाऊनवर चर्चा | Maharashtra News

शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये कुठल्या मुद्द्यावरून खलबतं झाली हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मात्र महाराष्ट्रातील लॉकडाऊनच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची शक्यता मीडिया रिपोर्टमधून वर्तवण्यात येत आहे. केंद्र सरकारने लॉकडाऊनसाठी नवे दिशानिर्देश जारी केली आहेत. दुसरीकडे महाराष्ट्रात करोनाचे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लॉकडाऊनमधून कुठल्या गोष्टींना सूट मिळणार याकडे लक्ष लागलं आहे


  • मुंबईः केंद्र सरकारने शनिवारी लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यासाठी दिशानिर्देश जारी केले. यानंतर काही वेळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मातोश्री येथे बैठक झाली. ही बैठक संपल्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये पुन्हा वर्षा बंगल्यावर बैठक झाली. यामुळे महाराष्ट्रातील राजकीय स्थितीबाबत या बैठका होत्या की लॉकडाऊनसंदर्भात यावरून आता राजकीय चर्चा रंगल्या आहेत. तर महाराष्ट्रात लॉकडाऊनमध्ये टप्पाटप्प्याने सूट देण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं मीडिया रिपोर्टमधून सांगण्यात येतंय.


शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये कुठल्या मुद्द्यावरून खलबतं झाली हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मात्र महाराष्ट्रातील लॉकडाऊनच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची शक्यता मीडिया रिपोर्टमधून वर्तवण्यात येत आहे. केंद्र सरकारने लॉकडाऊनसाठी नवे दिशानिर्देश जारी केली आहेत. दुसरीकडे महाराष्ट्रात करोनाचे रुग्ण वाढत आहेत. मुंबई, पुणे, नागपूर, मालेगाव, नवी मुंबई, ठाणे, औरंगाबाद या शहरांमध्ये करोनाचे रुग्ण वाढत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लॉकडाऊनमधून कुठल्या गोष्टींना सूट मिळणार याकडे लक्ष लागलं आहे.

महाराष्ट्रात लॉकडाऊनच्या नियमांमधून कुठल्या गोष्टींना सूट देता येईल यावर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा झाली. कंटेन्मेंट झोन वगळून मुंबई आणि पुण्यातही उद्योग आणि ई-कॉमर्स कंपन्यांसह जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांशिवाय इतर दुकानंही सुरू करण्याच्या मुद्द्यावर चर्चा झाली. महाराष्ट्र सरकारकडून रविवारी संध्याकाळपर्यंत नवे दिशानिर्देश जारी केले जातील, असं मीडिया रिपोर्टमधून सांगण्यात येतंय.

काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी काँग्रेस महाराष्ट्रात निर्णायक भूमिकेत नसल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर राहुल गांधींसह काँग्रेसच्या महाराष्ट्रातील वरिष्ठ नेत्यांकडून सारवासारव करण्यात आली होती. तसंच महाराष्ट्रात करोनामुळे बिकट स्थिती झाल्याने राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी करण्यात आली होती. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. त्यावेळच्या भेटीनंतरही राजकीय चर्चा रंगल्या होत्या.

No comments:

Post a Comment

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Post Top Ad

Your Ad Spot

Pages