भारताशी भिडणाऱ्या चीनचा माज, तैवानमध्ये लढावू विमानांच्या घिरट्या, मात्र तैवाननेही टेन्शन वाढवलं
चीनच्या कुरापती केवळ भारतापुरत्या मर्यादित राहिलेल्या नाही, तर याची झळ आता इतर शेजारी राष्ट्रांना देखील बसत आहे (Taiwan on Chinese Fighter plane ).
Taiwan on Chinese Fighter plane |
ताईपेई : चीनच्या कुरापती केवळ भारतापुरत्या मर्यादित राहिलेल्या नाही, तर याची झळ आता इतर शेजारी राष्ट्रांना देखील बसत आहे (Taiwan on Chinese Fighter plane ). चीन कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवरही शांत बसलेला नाही आणि इतर राष्ट्रांना देखील शांततेत काम करु न देण्याचाच चीनचा हेतू दिसत आहे. एकीकडे चीनच्या सैन्याने भारत-चीन सीमेवर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचं अतिक्रमण करत भारतीय सैन्यावर हल्ला केला. तर दुसरीकडे चीनच्या हवाई दलाने शेजारी राष्ट्र असलेल्या तैवानच्या हवाई हद्दीतही घुसखोरी केली. वारंवार चीनच्या या कुरापती पाहून अखेर तैवानने या चिनी विमानांना पिटाळून लावलं आहे.
चीनच्या लढाऊ विमानांनी 9 जूनपासून तब्बल 5 वेळा तैवानच्या हद्दीत घुसखोरी केली. अखेर आज (18 जून) पुन्हा चिनी युद्ध विमानं हद्दीत आल्यानंतर तैवानने आक्रमक पवित्रा घेत या घुसखोर चिनी विमानांना पिटाळून लावलं. यानंतर चीन आणि तैवानच्या सीमेवर देखील तणाव निर्माण झाला आहे. या दोन्ही देशांमधील संबंधही बिघडले आहेत.
तैवानने या घुसखोरीबद्दल म्हटलं, “चीनचे जे -10 आणि जे-11 लढाऊ विमानं तैवानच्या दक्षिण पश्चिम भागातील हवाईहद्दीत घुसले. नियमित टेहाळणी करणाऱ्या तैवानच्या युद्ध विमानांनी चिनी विमानांना रेडिओवरुन इशारा दिला. यानंतर चिनी विमानांनी तैवानची हद्द सोडली. 9 जूनपासून आतापर्यंत 5 वेळा चीनने असे अतिक्रमण केलं आहे. दरवेळी तैवानचे युद्ध विमानं चिनी विमानांना हाकलून लावतात.
तैवाननं म्हटलं आहे, “एकिकडे जग कोरोना विषाणू्च्या संसर्गाचा सामना करतं आहे. दुसरीकडे चीनने मागील काही महिन्यांपासून सैन्य हालचालींना वेग दिला आहे. या स्थितीतही चीन या बेटस्वरुप देशांवर आपला हक्क असल्याचा दावा करत आहे.
असं असलं तरी चीनने आतापर्यंत या मुद्द्यावर कोणतंही सार्वजनिक वक्तव्य केलेलं नाही. या प्रकारच्या सरावात कोणतीही विशेष बाब नाही. हे देशाची सार्वभौमता आणि सुरक्षेसाठी महत्त्वाचं आहे. चीनने तैवानवर नियंत्रण मिळवण्यासाठी अद्याप सैन्याचा उपयोग केलेला नाही. मागील महिन्यात चीनच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं होतं की तैवानसा स्वतंत्र होण्यापासून रोखण्यासाठी जेव्हा दुसरा पर्याय राहणार नाही तेव्हा सैन्य बळाचा उपयोग केला जाईन.
No comments:
Post a Comment