Sushant Singh Rajput suicide investigation |
रिया चक्रवर्ती वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये
रिया चक्रवर्ती आज सकाळी 11 च्या सुमारास वांद्रे पोलिसात दाखल झाली. (Rhea Chakraborty reaches Bandra Police station) तिचा जबाब नोंदवला जाणार आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी वेगवेगळ्या चार तपास यंत्रणा चौकशी करत आहेत. पोलीस अनेकांचे जबाब नोंदवत आहेत. वांद्रे पोलीस आज सुशांत सिंह राजपूतची मैत्रीण रिया चक्रवर्तीचा जबाब नोंदवत आहेत. रिया चक्रवर्ती आज सकाळी 11 च्या सुमारास वांद्रे पोलिसात दाखल झाली. (Rhea Chakraborty reaches Bandra Police station). रिया ही सुशांतची मैत्रीण आहे. सुशांत तिच्या संपर्कात होता. त्यामुळे सुशांतच्या आत्महत्येचं कारण काय असू शकतं, याबाबत पोलीस तिच्याकडे विचारणा करु शकतात.
त्याआधी पोलिसांनी काल कास्टिंग डायरेक्ट मुकेश छाब्राचा जबाब नोंदवला गेला. मुकेश हा सुशांतचा पहिला मेंटॉर होता. सुशांत हा चित्रपटाच्या स्क्रिप्टबाबत नेहमी मुकेशसोबत चर्चा करायचा. सुशांतला फोनवर बोलायला आवडत नव्हतं. त्याला गेम खेळायला आवडायचं. सुशांत मित्रांचे फोनही घ्यायचा नाही. 27 मे रोजी मुकेशचा वाढदिवस होता. त्यावेळी सुशांतने त्याला फोन केला होता. सुशांतला अनेक चित्रपट मिळाले होते, अशी माहिती यावेळी समोर आली.
सुशांतच्या चार पाच डायऱ्या जप्त करण्यात आल्या आहेत. त्याचा अभ्यास करणं सुरु आहे. त्यात त्याने जनरल लिहलं आहे. वाचताना काही चांगला विचार असेल तर तो ते नमूद करायचा. सुशांत हा 150 ड्रीमवर काम करत होता.
आर्थिक आणि त्याच्या फिल्मशी संबंधित व्यवहार बघणाऱ्या काही लोकांना आम्ही चौकशीसाठी बोलवणार आहोत. सुशांतची मैत्रीण रिया हिलाही चौकशीसाठी बोलावणार आहोत, असं पोलिसांनी सांगितलं होतं.
सलमान, करण जोहरविरोधात तक्रार
अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी बॉलिवूडमधील बड्या प्रस्थांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जाण्याची शक्यता आहे. निर्माते-दिग्दर्शक करण जोहर, संजय लीला भन्साळी, अभिनेता सलमान खान आणि निर्माती एकता कपूर यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सुशांतला 7 चित्रपटांमधून काढून टाकले गेले होते आणि त्यामुळेच त्याला आत्महत्या करण्यास भाग पाडले गेले, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
चार यंत्रणांकडून तपास
सुशांत सिंग राजपूत याने रविवारी (14 जून 2020) राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. त्यामुळे पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला. मात्र, सुशांतच्या मृत्यूबाबत त्याच्या कुटुंबाने आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळे पोलिसांनी याबाबत तपास सुरु केला. सुरुवातीला वांद्रे पोलीस तपास करत आहेत.
सुशांत सिंह राजपूत आत्महत्येचा तपास वांद्रे पोलीस, सायबर सेल, फॉरेन्सिक विभाग आणि मुंबई क्राईम ब्रांचकडून होत आहे.
(Rhea Chakraborty reaches Bandra Police station)
No comments:
Post a Comment