Maharashtra Political News
'महाराष्ट्रात सत्तेसाठी आमच्यासोबत विश्वासघात...'
आमच्यासोबत दगाफटका झाला नसता तर आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असते. जनतेनं भाजपलाच आपला कौल दिला होता, असं
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी म्हटलंय.
Maharashtra Political News
' महाराष्ट्रात सत्तेसाठी आमच्यासोबत विश्वासघात...'
फाईल फोटो
नवी दिल्ली : महाराष्ट्रात सत्ता हस्तगत न करता आल्याचं दु:ख अजूनही भाजपला सतावतंय. भाजपकडून फसवणूक होत असल्याचं सांगत उद्धव ठाकरे यांनी भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत हात मिळवणी करत राज्यात सत्ता स्थापन केली. त्यामुळे, राष्ट्रवादीच्या अजित पवार यांना सोबत घेऊन गुपचूपपणे शपथविधी पार पाडल्यानंतरही देवेंद्र फडणवीसांना सत्ता स्थापन करण्यात यश आलं नाही. हा गोष्ट भाजपच्या फारच जिव्हारी लागलीय. हीच सल
Maharashtra Political News 'महाराष्ट्रात सत्तेसाठी आमच्यासोबत विश्वासघात...'
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी एका मुलाखतीत बोलून दाखवलीय.
'समोर विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसशी लढाई होते तेव्हा भाजपला सहजच विजय मिळतो. परंतु, जेव्हा विरोधक म्हणून प्रबळ स्थानिक पक्ष उभा असतो तेव्हा लढाई अटीतटीची होते, मग ते उद्धव ठाकरे असो ममता बॅनर्जी असो, अरविंद केजरीवाल असो किंवा आणखी कुणी...?' असं का? असा प्रश्न जे पी नड्डा यांना विचारण्यात आला होता.
भाजपचं ट्विटर हॅन्डल
त्यावर उत्तर देताना 'उद्धव ठाकरेंच्या बाबतीत बोलायचं झालं तर ते तर आमच्यासोबतच निवडणूक लढवत होते. महाराष्ट्रात आम्ही पराभूत झालेलो नाही. महाराष्ट्रात आमच्यासोबत विश्वासघात झालाय... आणि तोही केवळ सत्तेसाठी... महाराष्ट्रात आम्ही निवडणूक जिंकलोय. जनतेनं आम्हाला आशीर्वाद दिला होता. देवेंद्र फडणवीस यांनीच मुख्यमंत्री व्हावं, अशी लोकांची इच्छा होती. लोकांन वाटत होतं की राज्यात भाजपची सत्ता यावी, पण असं घडलं नाही' असं नड्डा यांनी म्हटलंय.
करोना संकटाच्या काळातही उद्धव ठाकरे सरकारवर विरोधी पक्षाकडून सतत टीका होत आहेत. भाजप नेत्यांकडून अनेकदा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली गेली. 'महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा. ठाकरे सरकार कोरोनाचे संकट हाताळू शकत नाही, त्यांच्यात क्षमता नाही. कोरोनाचा सामना करण्यास सरकार अपयशी ठरलं आहे, त्यामुळे राज्यपालांनी या सरकारला नारळ देऊन राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी केली. राज्य कसे चालवावे, पोलीस यंत्रणा कशी हाताळावी, हे मुख्यमंत्र्यांना अद्याप जमत नाही. मनपा व राज्य सरकारच्या रुग्णालयांची अवस्था वाईट आहे. ही सर्व रुग्णालये लष्कराच्या ताब्यात द्यावीत. तरच परिस्थिती सुधारू शकते, अशी विनंतीही राज्यपालांना केली' असं भाजप नेते नारायण राणेंनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरून सांगितलं होतं. त्यानंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागणार का? यावर जोरदार चर्चाही रंगली.वाचा :ज्योतिरादित्य शिंदे 'भाजप'पासून दूर जाण्यामागचं सत्य!
वाचा :'सोन्याचं अंडं देणारी कोंबडी मारुन खाण्याचं मोदी सरकारचं धोरण'
No comments:
Post a Comment