Sushant Singh Rajput Suicide Case | 13 जणांचे जबाब, 'यशराज फिल्म्स'ला मुंबई पोलिसांचे पत्र
सुशांतसिंह राजपूतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिची काल जवळपास नऊ तास चौकशी करण्यात आली होती. (Sushant Singh Rajput Suicide Case Mumbai police sent letter to Yash Raj Films)
Sushant Singh Rajput Suicide Case Mumbai police sent letter to Yash Raj Films |
मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात काल झालेल्या चौकशीनंतर मुंबई पोलिसांनी बॉलिवूडच्या नामवंत ‘यशराज फिल्म्स’ला पत्र पाठवले आहे. सुशांतसोबत केलेल्या सर्व करारांचा तपशील पोलिसांनी मागवला आहे. (Sushant Singh Rajput Suicide Case Mumbai police sent letter to Yash Raj Films)
यशराज फिल्म्ससोबत सुशांतचा काही चित्रपटांसाठी करार झाला होता. या करारपत्राची प्रत द्यावी याबाबत पोलिसांनी काल यशराज फिल्मच्या मॅनेजरला पत्र पाठवलं आहे. या कराराची प्रत आज पोलिसांना उपलब्ध होणार आहे.
यशराज फिल्म्ससोबत सुशांतचा काही चित्रपटांसाठी करार झाला होता, मात्र तो नंतर रद्द झाला होता. त्यामुळे सुशांत नाराज झाला होता, मनाने खचला होता, असं त्याच्या जवळच्या व्यक्तींनी जबाबात सांगितलं आहे.
After yesterday’s interrogation in #SushantSinghRajput suicide case. Mumbai police have sent a letter to Yash Raj Films seeking details of all the contracts between them and Sushant. As of now 13 people have recorded their statement in this case including his near and dear ones.— Shivangi Thakur (@thakur_shivangi) June 19, 2020
सुशांतसिंह राजपूतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिची काल जवळपास नऊ तास चौकशी करण्यात आली होती. सकाळी 11 च्या सुमारास वांद्रे पोलिसात दाखल झालेल्या रियाचा जबाब रात्री जवळपास आठ वाजता संपला. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी त्याचे कर्मचारी, निकटवर्तीय आणि प्रियजनांसह 13 जणांचे जबाब नोंदवले आहेत.
सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी वेगवेगळ्या चार तपास यंत्रणा चौकशी करत आहेत. रिया ही सुशांतची मैत्रीण आहे. सुशांत तिच्या संपर्कात होता. त्यामुळे सुशांतच्या आत्महत्येचं कारण काय असू शकतं, याबाबत पोलिसांनी तिच्याकडे विचारणा केल्याची शक्यता आहे.
रियाने पोलिसांना सविस्तर उत्तरं दिली. या जबाब नोंदणीनंतर आता संंबंधित विभागाचे डीसीपी हे सुद्धा रियाकडे चौकशी करण्याची शक्यता आहे. (Sushant Singh Rajput Suicide Case Mumbai police sent letter to Yash Raj Films)
कास्टिंग डायरेक्ट मुकेश छाब्राचा जबाब
त्याआधी पोलिसांनी काल कास्टिंग डायरेक्ट मुकेश छाब्राचा जबाब नोंदवला गेला. मुकेश हा सुशांतचा पहिला मेंटॉर होता. सुशांत हा चित्रपटाच्या स्क्रिप्टबाबत नेहमी मुकेशसोबत चर्चा करायचा. सुशांतला फोनवर बोलायला आवडत नव्हतं. त्याला गेम खेळायला आवडायचं. सुशांत मित्रांचे फोनही घ्यायचा नाही. 27 मे रोजी मुकेशचा वाढदिवस होता. त्यावेळी सुशांतने त्याला फोन केला होता. सुशांतला अनेक चित्रपट मिळाले होते, अशी माहिती यावेळी समोर आली.
सुशांतच्या चार पाच डायऱ्या जप्त करण्यात आल्या आहेत. त्याचा अभ्यास करणं सुरु आहे. त्यात त्याने जनरल लिहलं आहे. वाचताना काही चांगला विचार असेल तर तो ते नमूद करायचा. सुशांत हा 150 ड्रीमवर काम करत होता. आर्थिक आणि त्याच्या फिल्मशी संबंधित व्यवहार बघणाऱ्या काही लोकांना आम्ही चौकशीसाठी बोलवणार आहोत, असं पोलिसांनी सांगितलं होतं.
सलमान, करण जोहरविरोधात तक्रार
अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी बॉलिवूडमधील बड्या प्रस्थांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जाण्याची शक्यता आहे. निर्माते-दिग्दर्शक करण जोहर, संजय लीला भन्साळी, अभिनेता सलमान खान आणि निर्माती एकता कपूर यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सुशांतला 7 चित्रपटांमधून काढून टाकले गेले होते आणि त्यामुळेच त्याला आत्महत्या करण्यास भाग पाडले गेले, असा आरोप बिहारच्या मुजफ्फरपूर न्यायालयात दाखल तक्रारीत करण्यात आला आहे.
चार यंत्रणांकडून तपास
सुशांत सिंग राजपूत याने रविवारी (14 जून 2020) राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. त्यामुळे पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला. मात्र, सुशांतच्या मृत्यूबाबत त्याच्या कुटुंबाने आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळे पोलिसांनी याबाबत तपास सुरु केला. सुरुवातीला वांद्रे पोलीस तपास करत आहेत. सुशांत सिंह राजपूत आत्महत्येचा तपास वांद्रे पोलीस, सायबर सेल, फॉरेन्सिक विभाग आणि मुंबई क्राईम ब्रांचकडून होत आहे.
No comments:
Post a Comment