Sushant Singh Rajput | मैत्रिणीसोबत तणावाचे संबंध, सुशांतसिंह राजपूतच्या नोकराचा दावा
सुशांतची कोणतीही सुसाईड नोट न सापडल्याने त्याच्या आत्महत्येच्या नेमक्या कारणांना अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही (Sushant Singh Rajput Servant claims Stressful Relations with alleged Girlfriend Rhea Chakraborty)
Sushant Singh Rajput Servant claims Stressful Relations with alleged Girlfriend Rhea Chakraborty |
मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येचा तपास पोलिसांकडून वेगाने सुरु झाला आहे. पोलिसांनी आतापर्यंत सहा जणांचे जबाब नोंदवले असून मैत्रिण रिया चक्रवर्तीसोबत त्याचे संबंध तणावाचे होते, असा दावा सुशांतच्या नोकराने केला आहे. (Sushant Singh Rajput Servant claims Stressful Relations with alleged Girlfriend Rhea Chakraborty)
रियासोबत सुशांतचे संबंध ताणले गेले होते. सातपैकी सहा चित्रपट हातातून गेल्यानेही तो तणावात होता, तसेच सुशांत आर्थिकदृष्ट्याही संकटात जात होता, असा दावा त्याच्या नोकराने पोलिसांकडे नोंदवलेल्या जबाबात केला आहे.
सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येने फक्त त्याचे कुटुंबीयच नाही, तर बॉलिवूड, क्रीडा विश्व आणि त्याचे चाहतेही शोकसागरात बुडाले आहेत. वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी आत्महत्या केल्याने सर्वजण हादरुन गेले आहेत. सुशांतचे वडील बिहारहून मुंबईत दाखल झाले असून त्याच्या पार्थिवावर आज (सोमवार 15 जून) दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
सुशांतने काल (रविवार 14 जून) वांद्र्यातील राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुशांतचे शवविच्छेदन काल रात्री करण्यात आले. त्याचे पोस्टमॉर्टम रिपोर्टही आले असून गळफास बसून श्वास कोंडल्याने त्याचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला पुष्टी मिळाली आहे. जेजे रुग्णालयात उत्तरीय तपासणी करुन त्याच्या शरीरात ड्रग्ज किंवा विष होते का, याची माहिती मिळेल.
सुशांतची कोणतीही सुसाईड नोट न सापडल्याने त्याच्या आत्महत्येच्या नेमक्या कारणांना अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही, परंतु नैराश्यातून त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज आहे. सुशांतच्या पश्चात वडील आणि बहिणी असा परिवार आहे.
See TV9 Marathi's other Tweets
नेमकं काय झालं?
सुशांत वांद्र्यातील ड्युप्लेक्स फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होता. त्याच्यासोबत स्वयंपाकी आणि दोन नोकर होते. सुशांत नेहमीप्रमाणे ज्यूस घेऊन वरच्या मजल्यावरील खोलीत गेला. जेवणाबाबत विचारणा करण्यासाठी नोकर गेले असता, उत्तर आले नाही. त्यामुळे तो झोपला असेल, असे समजून नोकर पुन्हा खाली गेले. काही वेळाने गेल्यानंतरही उत्तर न आल्याने सर्व जण घाबरले.
सुशांतची बहीण गोरेगावमध्ये राहते. सुशांत दार उघडत नसल्याचे नोकरांकडून समजल्यावर ती 40 मिनिटात त्याच्या वांद्र्यातील घरी पोहोचली. आवाज देऊन आणि फोन करुनही उत्तर न मिळाल्याने त्यांनी चावीवाल्याला बोलावले. परंतु लॉक न उघडल्याने अखेर दरवाजा तोडण्यात आला. तेव्हा सुशांत पंख्याला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला. दुपारी 3.30 वाजता त्याला कूपर रुग्णालयात नेण्यात आले, तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले.
हिरव्या रंगाच्या कुर्त्याने गळफास लावून सुशांतने फाशी घेतल्याची प्राथामिक माहिती आहे. गेले 5 ते 6 महिने मुंबईत तो मनोचिकित्सकाकडून नैराश्यावर उपचार करत असल्याचं म्हटलं जातं, मात्र उपचाराबाबत कोणतेही कागदपत्र मिळालेले नाहीत. सुशांतला कोणतीही आर्थिक अडचण नव्हती, अशी पोलिसांची माहिती आहे.
सुशांत सिंह राजपूतचा फोन पोलिसांच्या ताब्यात असून आदल्या रात्री त्याने मित्र महेश शेट्टीला फोन केला होता. त्याआधी बहिणीसोबतही त्याची फोनवरुन बातचीत झाली होती.
No comments:
Post a Comment