India 24Hours news

India News: Get latest news & live updates from India, live India news headlines, breaking news India. Read all latest India news & top news on India Today.

Breaking

Post Top Ad

Friday, May 29, 2020

स्त्री-पुरुष समानतेचे दिवे लावा; पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांना आवाहन| maharashtra news

maharashtra news

स्त्री-पुरुष समानतेचे दिवे लावा; पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांना आवाहन

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची ३ जून रोजी पुण्यतिथी आहे. त्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे.

बीड: करोनाची साथ आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी साध्या पद्धतीनं साजरी होणार आहे. 'कार्यकर्त्यांनीही घरात राहूनच पुण्यतिथी साजरी करावी. स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देणारे दोन दिवे लावावेत आणि मुंडे साहेबांचा आवडता पदार्थ घरात बनवावा,' असं आवाहन भाजपच्या नेत्या  पंकजा मुंडे यांनी केलं आहे.

येत्या ३ जून रोजी भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांची सहावी पुण्यतिथी आहे. मुंडे यांचे कार्यकर्ते व समर्थक हा दिवस 'संघर्ष दिन' म्हणून साजरा करतात. त्या निमित्त दरवर्षी गोपीनाथ गडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. मात्र, करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदा गोपीनाथ गडावर कुठलाही मोठा सोहळा होणार नाही. त्याऐवजी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत छोटासा कार्यक्रम होईल. तो लाइव्ह दाखवला जाईल,' असं पंकजा यांनी ट्विटरच्या माध्यमातून स्पष्ट केलं आहे. कोणीही गोपीनाथ गडावर गर्दी करू नये किंवा मला भेटण्यासाठी येऊ नये,' असं त्यांनी सांगितलं आहे.

कार्यकर्त्यांनी आपल्या घरातच मुंडे साहेबांची पुण्यतिथी कशी साजरी करावी, असं पंकजा यांनी म्हटलं आहे. ती कशी करावी, हेही पंकजा यांनी सांगितलं आहे. घरातील पुरुष व स्त्रियांनी मुंडे साहेबांच्या फोटोच्या दोन्ही बाजूला उभं राहून स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देणारे दोन दिवे लावावेत. त्याशिवाय, मुंडे साहेबांच्या आवडीचा पदार्थ घरात बनवावा. करोनाच्या पार्श्वभूमीवर कोणतंही एक सामाजिक कार्य करावं. अन्नदान, रक्तदान, मास्क किंवा औषधांचं वाटप करावं आणि हे सर्व करतानाचे फोटो माझ्या फेसबुक, ट्विटर व इन्स्टाग्राम अकाऊंटवर पाठवावे, असं आवाहन पंकजा यांनी केलं आहे. स्वत:ला जपा. गर्दी करू नका आणि घरातच राहा, असा प्रेमळ सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.

No comments:

Post a Comment

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Post Top Ad

Your Ad Spot

Pages