बीजिंग: 'कोव्हिड-१९'बाबत रविवारी चीनने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली असून,(coronavirus china cover up) करोना साथीची माहिती देण्यास उशिर केल्यासह इतर आरोप फेटाळून लावले आहेत. 'वुहान शहरात २७ डिसेंबरला सर्वप्रथम करोना विषाणू आढळला, तर त्याचा संसर्ग होत असल्याचे १९ जानेवारीला समोर आले,' असे चीनने यात म्हटले आहे.
करोना साथीची माहिती देण्यात चीनने विलंब केला; तसेच माहिती दडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे. चीन सरकारने प्रसिद्ध केलेल्या श्वेतपत्रितेक या आरोपांचे खंडन करणारे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. चीनच्या वुहान शहरात गेल्या वर्षी करोना संसर्गाचा उद्रेक झाला होता. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह काही देशांतील नेत्यांनी, चीन या साथीबाबत पारदर्शक नसल्याचा आरोप केला होता. चीनने साथीची माहिती उशिरा दिल्याने जगभरात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली; तसेच आर्थिक नुकसान झाल्याचा आरोपही करण्यात येत आहे. 'जॉन हॉपकिन्स करोना व्हायरस रिसोर्स सेंटर'ने दिलेल्या माहितीनुसार जगभरात सुमारे ६८ लाख लोकांना करोना संसर्ग झाला आहे, तर सुमारे चार लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.(coronavirus china cover up)
Corona virus china | ....................,
coronavirus china today |..............,
करोनाचा संसर्ग: चीनने केला 'हा' मोठा खुलासा.
चीनच्या श्वेतपत्रिकेनुसार, वुहानमधील रुग्णालयात २७ डिसेंबरला 'कोव्हिड-१९' आजाराचे निदान झाले. (coronavirus china cover up)स्थानिक सरकारने या रुग्णांचे विश्लेषण करण्यासाठी तज्ज्ञांना पाचारण केले. त्या वेळी ही व्हायरल न्युमोनियाची केस असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या उच्चस्तरीय तज्ज्ञांच्या पथकाने या विषाणूचा संसर्ग मानवाकडून मानवात होत असल्याचा निष्कर्ष १९ जानेवारीला काढला. या नव्या आजाराबद्दल तज्ज्ञांनी इशारा दिल्यानंतर महिनाभराच्या आतच पथकाने हे काम केले; तसेच त्यानंतर काही तासांतच लोकांना त्याबद्दल माहिती देण्यात आली.(coronavirus china cover up)
Corona virus china | ....................,
coronavirus china today |..............,
करोनाचा संसर्ग: चीनने केला 'हा' मोठा खुलासा.
'या आजाराचा संसर्ग माणसाद्वारे होतो याचे पुरेसे पुरावे १९ जानेवारीपूर्वी उपलब्ध नव्हते,' असे चीनमधील तज्ज्ञ वांग ग्वांफा यांनी सांगितले.(coronavirus china cover up) जानेवारीच्या सुरुवातीला वुहानमध्ये पाठवण्यात आलेल्या तज्ज्ञांच्या पथकात ग्वांफा यांचा समावेश होता. पथक ज्या वेळी वुहानमध्ये पोहोचले तेव्हा तेथे तापाचे रुग्ण वाढत होते. ज्या हुआनान येथील मांस बाजारात प्रथम करोना विषाणू उढळल्याचे सांगितले जाते, त्या बाजाराशी थेट संपर्क नसलेल्या व्यक्तींतही लक्षणे आढळून येत होती, असे ग्वांफा यांनी सांगितल्याचे चीनमधील 'ग्लोबल टाइम्स'ने म्हटले आहे.,coronavirus china cover up
'चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने १४ जानेवारीला वुहान आणि संपूर्ण हुबेई प्रांतात या विषाणूविरोधात लढण्यासाठी तयारी करण्याची सूचना दिली होती,' असे चीनने श्वेतपत्रिकेत म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने एकता दाखवायला हवी. त्यातून जग ही लढाई जिंकेल, असेही यात म्हटले आहे. करोना विषाणूच्या उगमाबाबत चौकशी करण्याचा ठराव जागतिक आरोग्य संघटनेने मंजूर केला आहे. त्याला चीननेही पाठिंबा दिला आहे.,coronavirus china cover up
No comments:
Post a Comment