Ahmednagar News............
पाईपलाईन रोडवरील भिस्तबाग चौकात दिवसा गजराज फॅक्टरीसमोर घरफोडी ...
दिवसा बंद घर फोडून घरातील ६३ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम चोरीला गेली. पाईपलाईन रोडवरील भिस्तबाग चौकात गजराज फॅक्टरीसमोर ही घरफोडी झाली.
India 24 hours News
नगर : दिवसा बंद घर फोडून घरातील ६३ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम चोरीला गेली.
पाईपलाईन रोडवरील भिस्तबाग चौकात गजराज फॅक्टरीसमोर ही घरफोडी झाली.
अमरजा गणेश कुलकर्णी (रा. भिस्तबाग चौक) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
तोफखाना पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक किरण सुरसे यांनी घटनास्थळी भेट दिली.
डॉग स्कॉड पथक पाचारण करण्यात आले होते. फिर्यादी यांच्या घरी कोणी नसताना चोरट्यांनी बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून ६३ हजार ५०० रुपयांची रक्कम चोरून नेली. फिर्यादी घरी आल्यानंतर त्यांना घरामध्ये चोरी झाल्याचे लक्षात आले.
त्यांनी तोफखाना पोलिसांना घटनेची माहिती दिली. पाळत ठेऊन चोरी केल्याचा पोलिसांना संशय आहे.
No comments:
Post a Comment