India 24Hours news

India News: Get latest news & live updates from India, live India news headlines, breaking news India. Read all latest India news & top news on India Today.

Breaking

Post Top Ad

Friday, May 29, 2020

मुंबई रिटर्न भावाला करोना; सप्तपदीनंतर नवरदेव क्वारंटाइन |mumbai covid 19,corona virus news

मुंबई रिटर्न भावाला करोना; सप्तपदीनंतर नवरदेव क्वारंटाइन |mumbai covid 19,corona virus news

मुंबई रिटर्न भावाला करोना; सप्तपदीनंतर नवरदेव क्वारंटाइन |mumbai covid 19,corona virus news 

करोनामुळे अनेक जण परदेशात अडकले, अनेकांची ताटातूट झाली, तर काहींवर पायीच गावाकडे जाण्याची वेळ आली. मात्र आपल्या भावाला करोना झाल्याचे समजताच एका नवरदेवावर सप्तपदीनंतर नववधूला सोडून लगेचच क्वारंटाइन होण्याची वेळ आली आहे.



म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

करोनामुळे अनेक जण परदेशात अडकले, अनेकांची ताटातूट झाली, तर काहींवर पायीच गावाकडे जाण्याची वेळ आली. मात्र आपल्या भावाला करोना झाल्याचे समजताच एका नवरदेवावर सप्तपदीनंतर नववधूला सोडून लगेचच क्वारंटाइन होण्याची वेळ आली आहे. लग्नाच्या पूर्वसंध्येला नवरदेवाच्या भावाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने या नवदाम्पत्याच्या आयुष्यात विरह आला आहे. पळसे गावात गुरुवारी ही घटना घडली. नवरदेव आता देवळाली कंटेन्मेंट रुग्णालयात क्वारंटाइन झाला आहे

पळसे येथील वधू आणि शिलापूर येथील वराचा शुभविवाह गुरुवारी पळसे येथे आयोजित करण्यात आला होता. बुधवारी सायंकाळी वधू-वराला हळद लावण्यात येत असतानाच असतानाच वराच्या मोठ्या भावाला करोनाची लागण झाल्याची बातमी धडकली. या बातमीने दोन्ही कुटुंबाला धक्का बसला. त्यामुळे गुरुवारी सकाळी सात वाजताच दोन्ही कुटुंबांतील मोजक्या आप्तेष्ठांच्या उपस्थितीत या हा लग्नसोहळा उरकण्यात आला. त्यांनतर नवरदेवासह त्याची आई, वडील, चुलत भाऊ यांना देवळाली रुग्णालयात क्वारंटाइन करण्यात आले. याशिवाय या विवाहास उपस्थित असलेल्या ३२ वऱ्हाडींना होम क्वारंटाइन करण्या आले. शिलापूर येथील वर पक्षाकडील मंडळीस नववधूशिवाय माघारी परतावे लागले.

भाऊ मुंबई रिटर्न

नवरदेवाचा भाऊ मुंबई येथून आलेला होता. आठवडाभरापूर्वीच घसा दुखत असल्याने त्याने शिलापूर येथील एका डॉक्टरांकडे उपचार देखील घेतले होते. प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्याच्या घशाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते

No comments:

Post a Comment

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Post Top Ad

Your Ad Spot

Pages