Rahul Gandhi News
... म्हणून याला फसलेलं लॉकडाऊन म्हणतो : राहुल गांधी
संसर्गाचा विचार करता भारत जगभरात सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. कोविड -१९ ची लागण झालेल्या रूग्णांची संख्या इटलीच्या तुलनेत
जास्त आहे. काही दिवसांपूर्वीच बाधितांच्या संख्येच्या दृष्टीने भारताने चीनलाही मागे सारले होते. अमेरिकेत जगात सर्वाधिक कोरोनाबाधित
रुग्ण आहेत.
Rahul Gandhi: Latest News, Photos, Videos on Rahul Gandhi ...
Rahul Gandhi: Latest News, Photos, Videos on Rahul Gandhi ... |
देशात करोनाची आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ; केंद्राने जाहीर केली आकडेवारी
स्पेन, जर्मनी, इटली आणि ब्रिटनचा आलेख राहुल गांधींनी शेअर केला, ज्यासोबत भारताचाही आलेख आहे. युरोपियन देशांमध्ये रुग्णवाढीचा दर कमी झाल्यानंतर अनलॉक करण्यात आलं होतं, तर भारतात रुग्णवाढ नसताना लॉकडाऊन होतं, पण रुग्ण वाढत असताना अनलॉक केलं आहे, असं राहुल गांधींनी याद्वारे सांगितलं.
भारताने इटलीलाही मागे टाकलं
गेल्या काही दिवसात भारतात रुग्णसंख्येचा आलेख वाढताच आहे. देशात प्रति १० लाख लोकसंख्येमागे ५ जणांचा मृत्यू झाला आहे. देशाची लोकसंख्या इतर देशांच्या तुलनेत जास्त असल्यामुळे हा दर कमी आहे. इटलीशी तुलना केली तर इटलीत प्रति १० लाख लोकसंख्येमागे ५५९ जणांचा मृत्यू झाला. तर इटलीत १ लाख ६४ हजार रुग्ण बरे झाले आहेत. देशातील करोना उद्रेकाचा वेग पाहिला तर येत्या काळात भारत युरोपियन देशांनाही मागे टाकण्याची शक्यता आहे. ब्रिटन आणि स्पेनला मागे टाकत भारत पुढील काही दिवसात सर्वात प्रभावित चौथा देश ठरू शकतो.
No comments:
Post a Comment