![]() |
...स्वतः राजकारण करताहेत; फडणवीसांचा CM ठाकरेंवर आरोप| political newsभाजपचे नेते आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. राजकारण करू नका असे सांगणारे स्वतःच राजकारण करत आहेत, असं ते म्हणाले.
मुंबई: रेल्वेगाड्यांच्या मागणीवरून राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप होत असताना, या वादात आता राज्यातील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी उडी घेतली आहे. एकीकडे राजकारण करू नका म्हणायचं आणि आपण राजकारण करायचं हे योग्य नाही, असा आरोप फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल, रविवारी राज्यातील नागरिकांशी फेसबुक व्हिडिओद्वारे संवाद साधला. त्यावेळी स्थलांतरित मजुरांसाठी रोज ८० ट्रेन सोडण्याची मागणी केली असली तरी, प्रत्यक्षात रेल्वेकडून ४० ट्रेन सोडल्या जात आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावर मजुरांची यादी आम्हाला द्या, असं उत्तर रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिलं होतं. त्याचवेळी आर्थिक मदतीच्या पॅकेजवरूनही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना टोला लगावला होता. आता यात फडणवीस यांनीही मुख्यमंत्र्यांवर राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे.
रेल्वे मंत्रालयाकडून महाराष्ट्रासाठी आतापर्यंत ५२५ रेल्वेगाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत आणि त्यातून जवळपास साडेसात लाख श्रमिकांनी प्रवास केल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. आपलं अपयश झाकण्यासाठी वारंवार केंद्राकडे बोट दाखवणे चुकीचे आहे, असे फडणवीस म्हणाले.
ज्या-ज्या वेळी ट्रेन सोडण्याची मागणी केली जात आहे, त्यावेळी त्या दिल्या जात आहेत. अशा प्रकारचे राजकारण करण्याची आवश्यकता नाही. ट्रेन मागितल्या जातात, पण त्या मिळत नाहीत असं मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे खासदार सांगतात, पण ते चुकीचे आहे, असेही ते म्हणाले. राज्यातील, तसेच मुंबईतील परिस्थिती बिकट होत आहे. कोविडवर कुठलंही नियत्रण मिळवता येत नाही. आपलं अपयश झाकण्यासाठी वारंवार केंद्राकडे बोट दाखवणे चुकीचे आहे. राजकारण करू नका म्हणायचे आणि आपण स्वतः राजकारण करायचे हे योग्य नाही. केंद्र-राज्य सरकारने मिळून काम केले पाहिजे. त्यादृष्टीने अशा प्रकारचे राजकारण बंद केले पाहिजे, असेही ते म्हणाले.
|
Post Top Ad
Sunday, May 24, 2020
Home
Facebookpages
Maharashtra News
mumbai
Pune News in Marathi
महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
...स्वतः राजकारण करताहेत; फडणवीसांचा CM ठाकरेंवर आरोप| political news
...स्वतः राजकारण करताहेत; फडणवीसांचा CM ठाकरेंवर आरोप| political news
Tags
Facebookpages#
Maharashtra News#
mumbai#
Pune News in Marathi#
महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times#
Share This
महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags:
Facebookpages,
Maharashtra News,
mumbai,
Pune News in Marathi,
महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Subscribe to:
Post Comments (Atom)
Popular Posts
-
Shiv Sena 54 | On the 54th anniversary of Shiv Sena, Uddhav Thackeray will announce the next course of the party | शिवसेना५४ | शिवसेन...
-
दुनियाभर के कई देश लॉकडाउन हटाने या नियम आसान करनेजा रहे हैं। शुरुआत स्कूलों से हुई है। सबसे पहले चीन ने प्राइमरी स्कूल शुरू किए थे। अब तक ...
-
आयसीएआरच्या शास्त्रज्ञांनी करोनावर शोधले औषध! सध्या करोना ही महामारी जगासमोर आतापर्यंतचे सर्वात मोठे संकट म्हणून उभे राहिले आहे...
-
India China face off : गलवान संघर्षावर भेकड चिनी प्रवक्त्यांचा नवा दावा लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत-चीन सैन्यात झालेल्या संघर्षावर चीनने...
-
Pankaja calls Dhananjay अपने तो अपने होते है | पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना फोन, तब्येतीची विचारपूस धनंजय मुंडे यांचा कोरोना र...
Contact Form
Post Top Ad
Your Ad Spot

No comments:
Post a Comment